आत्महत्यग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला सेविंग चे पैसे देण्यास मनाई
पंचवीस हजार रुपये चा इन्शुरन्स करा अन्यथा पैसे मिळणार नाहीत बँक कर्मचाऱ्यांची मुग्रुरी
उपळवाटे येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाने ( समाधान राजेंद्र देवडकर यांनी) घर बांधण्यासाठी स्वतःच्या ट्रॅक्टर वरती महिंद्रा फायनान्स चे रिफायनान्स करून पाच लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते व त्या कर्जाची रक्कम कोटक महिंद्रा बँक येथे स्वतःच्या बचत खात्यावरती जमा करून घेतली होती व त्या रकमेतून त्याने लागतील असे म्हणजेच साधारणता दोन लाख पर्यंत पैसे काढून घेतले व त्यानंतर समाधान बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्यास बँकेचे मॅनेजर अनिल दळवी यांनी तुझे खाते लॉक झाले आहे असे कारण सांगून पैसे काढता येणार नाहीत त्यासाठी पंचवीस हजार रुपये रकमेचा इन्शुरन्स करून घे त्यानंतर तुझे अकाउंट चालू होईल असे सांगत दोन महिने टोलवाटोलवी केली.
ही बाब जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांच्या कानावर पडतात ते स्वतः कार्यकर्त्यांसह तात्काळ बँकेमध्ये येऊन जाब विचारल्यास तेथील कर्मचाऱ्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली.
त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलावर अन्याय होताना दिसतात अतुल खूपसे यांनी स्वतः बँकेचे दरवाजे बंद करून बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांसह आंदोलकांसह स्वतःला आतून कोंडून घेतले व जोपर्यंत आत्महत्याग्रस्त मुलाचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत बँकेत मुकाम आंदोलन पुकारले.