जांबुड येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर शूरवीर संभाजी करवर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन जेष्ठ नेते माजी सरपपंच नारायण पाटील सरपंच मा.राहुल खटके मा.पोपट यमगर सरपंच करोळे ग्रामपंचायत मा.अप्पासाहेब हांडे मा.ग्रामपंचायत सदस्य मा.महावीर माने मा.उपसरपंच मा.प्रदिप नाईकनवरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दलित महासंघ यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी मान्यवर मंडळीनी इतिहासातील बरेच पराक्रमाची आठवण करुन दिली. यावेळी हटकर समाज महासंघ चे अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील यांनी आपले मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दहा अंगरक्षक पैकी एक शुरवीर संभाजी करवर यांचा इतिहास सांगताना संभाजी करवर यांनी अफजल खान व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतापगडाच्या भेटीत महत्वाची जबाबदारी पार पाडली होती.तसेच महाराष्ट्रात च नव्हे तर नाशिक परिसर रायगड किल्ला परिसरात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर कर्नाटक राज्यात तंजावर येथे लढाई साठी गेले होते.
यांचा इतिहास सांगितला. यावेळी
युवा नेते विठ्ठल भोसले मा.समाधान नाईकनवरे ग्रामपंचायत सदस्य मा.शिवाजी कचरे क्रिकेट निवेदक मा.शिवाजी नाईकनवरे मा.ज्ञानेश्वर नलवडे मा.गणेश कोळी अष्टपैलू क्रिकेटपटू मा.सचिन भुसनर मा.पप्पु भुसनर अभिषेक भोसले या मान्यवरांचे उपस्थितत प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन आर.पि.आय.माळशिरस तालुका अध्यक्ष मा रविराज बनसोडे सर यांनी केले.