Type Here to Get Search Results !

हटकर समाजाचे प्रलंबित प्रश्नाबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार


सांगोला प्रतिनिधी 
     हटकर समाजाचे प्रलंबित प्रश्नाबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे दत्तात्रय भुसनर यांनी सांगितले ते श्री मल्लूदेवी क्षेत्र घोरपडी येथे दसरा मेळावा प्रसंगी बोलत होते.
आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा व शूरवीर संभाजी करवर यांचे स्मारक उभारणे काळाची गरज आहे .मल्लूदेवी क्षेत्र घोरपडी हे पर्यटन स्थळ होण्यास प्रयत्न करणार व हटकर समाजाच्या मागण्या शासनाकडे सादर करणार असल्याचे सांगितले .
दसरा मेळाव्यातून हटकर समाजाला स्वाभिमान प्रेरणा व आत्मविश्वास मिळेल तसेच समाजाला शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तरुणांनी एकत्र यावे असे तुकाराम भुसणर सर यांनी सांगितले. 
दसरा मेळाव्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी तळागाळातील समाजाला एकत्र करू.
 सत्ताधारी व विरोधी पक्षाने हटकर समाजाचा केवळ राजकारणासाठी वापर केला हटकर समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणार . मराठा समाजाने आंदोलन करून आरक्षण व शासनाच्या योजना मिळवल्या त्या पद्धतीने हटकर समाजाला सुद्धा आंदोलन करून न्याय मिळवावा लागेल असा इशारा युवक नेते विजयराज मरगर यांनी दिला. 
हटकर समाजाला राजकीय आरक्षण नसल्याने आर्थिक, राजकीय, सामाजिक सवलती मिळत नाहीत त्यामुळे समाजाचा विकास होऊ शकला नाही असे मत सेवानिवृत्त प्रा. महादेव पाटील सर यांनी सांगितले.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कृषिरत्न सदाशिव चौगुले तसेच ओबीसी मोहोळ तालुका अध्यक्ष नितीन निळे व भाजपचे पंढरपूर तालुका चिटणीसपदी निवड विजय भुसणार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला कुंभारी चे दाजी पाटील यांनी जादूचे प्रयोग व वैज्ञानिक प्रयोग करून दाखवले मल्लूदेवीची पुजारी यांनी संस्कृती धनगरी ओव्यांचा कार्यक्रम सादर केला. 
सूत्रसंचालन आबासाहेब शेवाळे यांनी तर प्रस्तावना डी एस निळे यांनी केले. या वेळी ओबीसी व हटकर संघटनेचे नेते भीमराव भुसणर, हनुमंत येजगर सर, शंभुराज पाटील, नवनाथ पाटील, विश्वास निळे, रानगर सर ,प्रकाश भंडे, रवी जीपटे, हेमंत पाटील, महावीर बंडगर यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी आभार प्रदर्शन नामदेव पाटील यांनी केले यावेळी विविध भागातून बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News