आहेरगाव अपंग व्यक्तीस ढकलून देऊन जीवे मारण्याची धमकी
रोहित राजाराम झुंजारे वय 19 वर्ष रा. आहेरगांव ता. माढा जि. सोलापुर
दिनांक 30/09/2025 रोजी सकाळी 08.45 वा चे सुमारास माझे वडील, व आई हे शेतामध्ये गेले होते.
माझ्या वर उपचार चालू असल्याने अंगनामध्ये व घरासमोरील रस्त्यावर अंपगाचे बुट घालुन चालण्याचे सरावा करण्या करीता सोडलेले होते.
मी आमचे अंगनामध्ये व घरासमोरील रस्त्यावर सकाळी 09.00 वा चे सुमारास चालत असताना आमचे घराचे शेजारी राहणारे उत्तम दत्तू करंडे हे राहत असल्याने त्यांचे बाथरूमचे पाणी आमचे घरामोरील रस्त्यावर आले असल्याने मी पुजा आणा करंडे यांना रस्त्यावर पाणी सोडू नका असे म्हणाल्याने त्यांनी रागाला जावून कुठे पाणी आले आहे असे म्हणून मला ढकलून दिले. तेव्हा मी खाली पडलो असताना त्यांचे घरातील उत्तम दत्तू करेंडे, ज्ञानदेव दत्तू करंडे, महादेव निवती जगताप हे तेथे आले व त्यांनी सर्वांनी मिळुन तुझा काय संबंध लंगड्या, पांगळ्या तु काय आता निट होणार आहे काय, असे म्हणून घाण घाण शिवीगाळी केली.
तेव्हा माझे वडील राजाराम, आई कांचन व स्वप्नील दिलीप झुंजारे हे तेथे आले तेव्हा त्यांनी माझे आई, वडील यांनाही घाण घाण शिवीगाळी वरील सर्वांनी केली व तुम्ही जास्त आगाउ पणा करता काय तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.
1. पुजा आणा करंडे 2. उत्तम दत्तू करंडे 3. ज्ञानदेव दत्तू करंडे 4. महादेव निव्रती जगताप सर्व रा. आहेरगांव ता. माढा जि. सोलापुर यांचे विरुद्ध कलम 115(2),351(3),352,
अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम,92(a),
अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम, 2016, 92(b) नुसार टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल.
पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे बिरुदेव हजारे साहेब करत आहेत
