दिनांक 2 /10/2025 रोजी सकाळी 12:30 वाजता श्री मलुआई मंदिर घोरपडी ता.कवठे महांकाळ जि.सांगली येथील दसरा मेळावा कार्यक्रमाची सुरुवात शुरवीर संभाजी करवर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर मंडळी च्या उपस्थितीत करण्यात आले.
मेळाव्यात अनेक मान्यवर मंडळी नी आप आपले मत मांडले. दसरा मेळावा निमित्ताने हटकर समाजाचे अध्यक्ष व शिवसेना ओबिसी आघाडी चे प्रदेश अध्यक्ष मा भिमराव भुसनर पाटील म्हणाले हटकर समाज संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला असून आर्थिक, शैक्षणिक, व शासकीय योजनांचा लाभ, तसेच हटकर व धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असुन हटकर समाजातील युवा उद्योजक मंडळी चे कौतुक केले.व हटकर समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी करण्या करता एकत्र येण्याचे आवाहन केले.तसेच संपूर्ण महाराष्ट्रात शुरवीर संभाजी करवर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम घेणारे समाज बांधवांचे अभिनंदन केले यावेळी समाजातील शासकीय क्षेत्रातील नूतन अधिकारी व विविध राजकीय पक्षाचे नूतन पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जुन्या परंपरा रुढी परंपरेने पुजारी बंधुनी धनगरी ओव्या व गजी ढोलच्या कार्यक्रमांनी दसरा मेळाव्याची शोभा वाढवली. तसेच दाजी पाटील कुंभारीकर यांनी जादूचे प्रयोग दाखविण्यात आले. सदर मेळाव्या प्रसंगी हटकर समाजाचे जेष्ठ कलाकार श्रीमंत पुजारी पाटील, युवा उद्योजक राजु नायकवडी सांगली, युवा उद्योजक पैलवान विजय भुसनर प्रा.हनुमंत यजगर सर शिवसेना नेते मा.विजय मरगर प्रा.महादेव पाटील सर कोल्हापूर मा.शंभुराजे पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण मा.दत्तात्रय भुसनर साहेब पुणे राजा पंढरीचा नेटवर्क कंपनी, मा.राणु पाटील संचालक पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर, मा.तुकाराम भुसनर सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, मा.महावीर बंडगर युवा उद्योजक मा.नितीन निळे मा.हेमंत पाटील अध्यक्ष कर्तव्य दक्ष सेवाभावी संस्था, सोलापूर जिल्हा हटकर समाज अध्यक्ष सुर्यकांत खुळे,मा.रानगर सर, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते मा.प्रकाश भंडे, कृषी अधिकारी सुरेश चौगुले साहेब,मा.रवि जिपटे, मा.युवा उद्योजक मा विश्वास निळे हिवरे जत मा.नवनाथ पाटील मा.जयसिंग पाटील, मनसे जत तालुका अध्यक्ष मा.बलभिम पाटील, पैलवान सुरेश निळे मा बिभीषण बंडगर मा विष्णु पाटील मा मुकुंद व्हरगळ, युवा नेते मा.आप्पासो पुजारी, मा.वसंत मिसकर,मा.पप्पु भंडे, मा.संजय पाटील, सरपंच मा.नितीन कांबळे मा.सरपंच मा.भगवान सरगर ,मा.संपत नरळे, बिरु पुजारी, मा.रामा पुजारी, मा.दादु पुजारी, सरपंच मा.बापु भुसनर, मा.दत्ता पाटील, मा.सुखदेव पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबासाहेब शेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नामदेव पाटील यांनी मानले.
