आज दि .28/10/2025 रोजी मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे मॅडम, मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले सर, मा.अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ.चंद्रकांत क्षीरसागर सर, मा.निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी सर, जिल्हा मौखिक अधिकारी डॉ.रोहन वायचळ सर, जिल्हा सल्लागार डॉ. दळवी मॅडम, कुर्डूवाडी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सारिका गटकुळ मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली तंबाखू मुक्त युवा अभियान 0.3 अंतर्गत कुर्डूवाडी शहरामध्ये कोटपा कायदा 2003 ची अंमलबजावणी करण्यात आली.
सदरची अंमलबजावणी शाळा, महाविद्यालय, शासकीय व निमशासकीय कार्यालये, आरोग्य संस्था यांच्या 100 मीटर यार्ड मध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थची विक्री करणाऱ्या 11 पान टपरी धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई ही जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय सोलापूर, कुर्डूवाडीशहर पोलीस स्टेशन,मधील अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरीत्या केली.🚭