Type Here to Get Search Results !

सांगोला हटकर समाज मेळावा व वधुवर परीचय मेळावा संपन्न.


सांगोला/प्रतिनिधी :

हटकर समाज संघटना व शुरविर संभाजी करवर प्रतिष्ठाण च्यावतीने चांगले कार्य सुरु आहे. हे कार्य राष्ट्रीय स्तरापर्यत पोहचविण्याची गरज आहे. हे कार्य समाजातील तरुणांनीच पुढे येऊन पोहचविले पाहिजे असे अवाहन ज्ञानदेव करवर यांनी केले. हटकर संघटना व शुरविर संभाजी करवर प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वधु-वर परीचय मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन ज्ञानदेव करवर बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. नव वधु-वरांची लग्नपत्रिका किंवा जन्मकुंडली बघण्याची आवश्यक्यता नाही. कारण त्याला शास्त्राचा आधार नाही. सोयरीक जुळवताना जवळचे नातेवाईकांच्या नात्याच्या पलीकडचे नाते जोडावे. मुला-मुलीच्या अतिमहत्वकांक्षेमुळे मुला मुलीचे लग्नाचे वय वाढु देऊ नये. लग्न हा कौटुंबीक सोहळा आहे. तो साध्या पध्दतीने करावा. व त्याला राजकीय स्वरूप येऊ देवू नये. लग्नामध्ये लग्नपत्रीका, हार तुरे, सत्कार शक्यतो टाळावे असे उ‌द्घाटक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापिठाचे मा.प्र. कुलगुरु एस.आय. पाटील यांनी सांगीतले.

यावेळी, प्रशासन अधिकारी चंद्रकांत होळकर, पो. निरिक्षक गोदे, मार्गदर्शक साहेबराव पाटील, युवा नेते, नाथा पाटील, निवृत्त पो. अधिकारी रानगर, राजु नाईकवडी, रुक्मिणी मल्टिपर्पज हॉलचे महादेव येजगर, डॉ. नितीन चौंडे, डॉ. एस. एम. दबडे, अॅड. बंडु पाटील, बंडगर गुरुजी, अॅड. शरद पाटील, शिवानी उ‌द्योग समुहाचे विश्वास निळे, मारुती भुसनर, विजय येजगर,, विजय भुसनर, नवनाथ पाटील, कर्तव्य संस्थेचे हेमंत पाटील, सरपंच बाबुराव सोपे, कृषीरत्न सदाशिव चौगुले, बापुसो दबडे, सुर्यकांत खुळे, अशोक करताडे, पांडुरंग पाटील, जयाप्पा बेलदर, बाळासाहेब कोरके पै. नितिन निळे, जालिंदर महाराज चौगुले, सुरेश पाटील, नामदेव घुणे, बंडु सोपे, बापू निळे, श्री व सौ. राजश्री चौगुले, युवा कार्यकर्ता रोहन पाटील आदी उपस्थित होते.

हटकर समाज हा वेगवेगळ्या भागात विखुरलेला असुन प्रामुख्याने शेती व्यवसाय आहे. राजकीय क्षेत्रापासुन वंचीत असलेल्या या समाजाला शासनदरबारी स्थान मिळाले पाहिजे. तसेच शासनकडुन विविध योजनांचा लाभ मिळाला पाहीजे. शासनाच्या मुख्य प्रवाहात हटकर समाज आला पाहीजे त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत मुख्याध्यापक भुसनर सर यांनी व्यक्त केले.

देशातील अनेक जाती अर्थिक, शौक्षणिक क्षेत्रात विकासापासुन दुर आहेत. स्वातंत्र्यानंतरही हटकर समाजाचे प्रश्न कायम असल्याचे मत दत्तात्रय भुसनर यांनी सांगीतले. समाज्यांचा चौफेर विकासासाठी तरुणांनी एकत्र येण्याची गरज असुन आपले मुलभुत प्रश्नासाठी संघर्षाची तयारी करावी असे कृषी उत्पन्न बाजार समीती फलटणचे संचालक शंभुराज विनायक पाटील यांनी सांगीतले. समाजाचे प्रलंबीत प्रश्न, समष्या, अडचणी शासनापर्यंत पोहचविणार व शिक्षणातुन समाजाची परीवर्तन होवु शकते. असे शिंदे गटाचे युवा नेते विजयराज मरगर यांनी सांगीतले.

यावेळी सा.बां. विभागाचे दशरथ यमगर यांचा सेवा निवृतीनिमित्त सत्कार करण्यात आला. लोकशक्ती चॅनेलचे नामदेव लकडे यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी पो. नि. गोदे, नितिन जुजारे, सुकदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. घोरपडी गावचे गजी ढोल कलाकार यांनी कार्यक्रम सादर केला. संघटनेचे पदाधिकारी सर्व ग्रामस्थ, महिला व समाजबांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमावेळी लक्ष्मण निळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रस्तावना मुकुंद व्हळगळ यांनी केले. सुत्रसंचलन आबासो पाटील व आभार प्रादर्शन आण्णासो भुसनर महाराज यांनी केले.

हटकर समाजमेळावा व वधुवर परीचय मेळावा संपन्न.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News