Type Here to Get Search Results !

Political : काकांचा राग ; ही सगळी इंटरनॅशनल 'टोळी',आपण संपू पण ही संपणार नाही ; उमेश पटिल...

Political : काकांचा राग ; ही सगळी इंटरनॅशनल 'टोळी',आपण संपू पण ही संपणार नाही ; उमेश पाटील म्हणतात, फक्त बघतो मोहोळची मालकं किती मदत करतात

सोलापूर : लक्ष्मण शिंदे
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या सुनबाई वैशाली जितेंद्र साठे या निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीमुळे काका साठे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दूध संघाच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षीय नेते एकत्र झाले मात्र यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठी कुठेच दिसले नाहीत मोहोळ तालुक्यातील 47 महत्त्व वाढल्याने राजन पाटील यांची पॉवर वाढली आहे. काका साठे यांनी आपल्या सुनेचा अर्ज ठेवून राजकीय खेळी केली असून यामध्ये मोहोळचे पाटील मदत करणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. वैशाली साठे यांच्या उमेदवारीने जिल्हा दूध संघ बचाव कृती समितीची ताकत वाढल्याचे चित्र आहे. 
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम काका साठे व जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील या दोघांची भेट झाली. त्याच वेळी त्या ठिकाणी दूध संघ बचाव कृती समितीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब धावणे हे सुद्धा होते, यावेळी उपस्थित पत्रकारांनी काका साठे यांना या विषयावर छेडण्याचा प्रयत्न केला. सर्व पक्ष एकत्र झालेले असताना तुम्ही सत्ताधारी पॅनलच्या विरोधात असलेल्या दूध संघ बचाव कृती समितीमध्ये का गेलात? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर त्यांनी बोलणे टाळले,
 आपला या निवडणुकीशी काहीही संबंध नाही असे म्हणून विषय बदलण्याचा प्रयत्न केला मात्र काका साठे यांना सर्वपक्षीय नेत्यांनी विश्‍वासात न घेतल्याचा राग त्यांच्या चेहर्‍यावर होता ही सगळी नेतेमंडळी म्हणजे इंटरनॅशनल 'टोळी' आहे, ज्याच राजकीय अस्तित्व संपले, अशाला सुद्धा पुनर्जीवित करतात हे सर्व लोक, कधीच संपणारे नाहीत, आपणच संपू अशा शब्दात त्यांनी राग व्यक्त केला.
हे सर्व उमेश पाटील ऐकत होते, ते म्हणाले, दुधाचं कुणीच बोलत नाही, संघाचच बोलत आहेत. 
दूध संघाच्या निवडणुकीत कोणता पक्ष नाही. कोण कोणालाही मदत करू शकतो. परंतु माझं लक्ष आहे ते मोहोळवर आज पर्यंत काका साठे यांची मोठी मदत मोहोळच्या नेत्यांना मिळाली आहे आता काका साठे यांना मदत करण्याची गरज असून आज पर्यंतच्या सहकार्याची परतफेड होणार का? आणि नाही झाल्यास काका साहेब, आम्ही म्हणेल ते तुम्हाला करावे लागेल अशी भूमिका उमेश पाटील यांनी मांडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies