Type Here to Get Search Results !

फलटण येथे राज्यस्तरीय ओपन बास्केटबॉल स्पर्धा संपन्न : पुण्याच्या संघाने पटकावले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक...

फलटण येथे राज्यस्तरीय ओपन बास्केटबॉल स्पर्धा संपन्न : पुण्याच्या संघाने पटकावले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक..
फलटण संस्थान युवराज युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय ओपन बास्केटबॉल स्पर्धेमध्ये पुणे येथील मॅथ्यूज (पुणे) संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना २१ हजार रोख व चषक मिळविला, तर व्दितीय क्रमांक कोल्हापूर येथील प्रिन्स युनायटेड संघाने पटकवला असून त्यांना १५ हजार रोख व चषक मिळविला, तृतीय क्रमांक बीड येथील संघाने पटकावला असून त्यांना ११ हजार रोख व चषक असे वितरित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभ फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी विजेत्या संघाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी श्रीमंत विश्वजीतराजे (बाबा) यांनी शुभेच्छा दिल्या.
       
बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी माजी उपनगराध्यक्ष नितीनभैय्या भोंसले-पाटील, सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, महेंद्र जाधव, सौ.निलम लोंढे-पाटील, सौ.अमृता नाईक निंबाळकर, सौ.सोनाली सुर्यवंशी-बेडके, दादासाहेब चोरमले, महेंद्र जाधव, शाम कापसे, विजय लोंढे-पाटील, भाऊ कापसे व पत्रकार बंधू यांची प्रमुख उपस्थिती होती.
       
सदरील स्पर्धेमध्ये बेस्ट प्लेयर किताब पुणे संघाचे सिद्धांत शिंदे यांनी पटकावला. बीड संघातील मिथुन दास यांनी बेस्ट शुटर हा किताब पटकावला, तर बेस्ट प्लेअर ऑफ फायनल मॅच हा किताब कोल्हापूर संघाचे ओम चोपडे यांनी पटकावला. स्पर्धेमध्ये राज्यातील २१ संघांनी सहभाग नोंदविला, या राज्यस्तरीय ओपन बास्केटबॉल स्पर्धेमध्ये पुणे, कोल्हापूर, बीड, सोलापूर, मिरज, घुणकी, सातारा, बारामती, इस्लामपूर, मालवण, अकलूज, सांगोला, फलटण या संघांनी आकर्षक खेळ करुन फलटण वासीयांची मने जिंकली.
       
मा.नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व बास्केटबॉलचे आजी माजी खेळाडू यांच्या वतीने मुधोजी क्लब, फलटण येथे बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्पर्धेचे उदघाटन फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी बास्केटबॉल खेळाचा वाढलेला प्रतिसाद हा अतिशय स्तुत्य असल्याचे मत आमदार दिपकराव चव्हाण साहेब यांनी यावेळी व्यक्त केले. 
बास्केटबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी मा.नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, मा.नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ.प्रगती कापसे, सौ.दिपाली निंबाळकर, सौ.वैशाली चोरमले, सौ.ज्योत्स्ना शिरतोडे, सौ.प्रीतम लोंढे-पाटील, हेमंत रानडे, अमरसिंह खानविलकर, सौ.सारिका चव्हाण, सौ.घाडगे, दादासाहेब चोरमले, सौ.सोनाली सुर्यवंशी-बेडके, रामदादा नाईक निंबाळकर, अजिंक्य गायकवाड व बाळासाहेब बाबर व पत्रकार बंधू यांची प्रमुख उपस्थिती होती.
       
बास्केटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, मा.नगरसेवक चंद्रकांत शिंदे, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेवराव माने, पोलीस उपनिरीक्षक रावळ, डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य, डॉ.रविंद्र बिचुकले, सौ.निलम लोंढे-पाटील, सौ.सौदामिनी गांधी, सौ.सोनाली सुर्यवंशी-बेडके, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.निलीमा देशमुख यांनी केले. 
       
राज्यस्तरीय ओपन बास्केटबॉल स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी मा.नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, अतुल यादव, भास्कर ढेकळे, निलेश शहाणे, सागर मेघवाणी,मुन्ना शेख, संजय फडतरे, योगेश कापसे,अमित मेघवाणी,रोहन निकम, आदित्य राशिनकर, वृषभ शहा, सिद्धार्थ फणसे, योगेश तारु, संकेत कुंभार, आदित्य बोबडे, यश जाधव, गौरव खरात, आदित्य ढेंबरे, ओम शिंदे, रोहन गायकवाड, सागर मेघवाणी, ओमकार परदेशी, आजी माजी बास्केटबॉल खेळाडू, मुधोजी क्लबचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad