दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता मौजे वाणीं चिंचोळे येथे हटकर समाजचा भव्य दिव्य असा वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमासाठी शासकीय अधिकारी,उद्योजक,डाँक्टर, वकील,विविध पक्षाचे व संघटनेचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी हटकर समाज महासंघाचे प्रदेश कोअर कमिटी संचालक ह.भ.प.अण्णा महाराज भुसनर, विठ्ठल कारखाना मा.संचालक दत्तात्रय चौगुले मा.तानाजी खोत, दुध संस्था चेअरमन मा.सतीश करवर,चांगदेव यमगर, कॅप्टन भाऊसाहेब पाटील, मा.जयसिंग पाटील,मा.लक्ष्मण पाटील सर, युवा उद्योजक भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पैलवान मा.विजय भुसनर मा.बिटु करवर मा.संचालक पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर लोकशक्ती टाइम्स चे संपादक मा.नामदेव लकडे साहेब, 91न्युज चे संपादक समाधान यमगर साहेब तसेच हटकर समाज महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष दरेश्वर चौगुले, उपाध्यक्ष जनार्धन बिराजदार, जत तालुका अध्यक्ष दत्ता गोदे,सोलापूर जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत खुळे, पंढरपुर तालुका युवा अध्यक्ष अर्जुन यमगर , मंगळवेढा तालुका अध्यक्ष सचिन खुळे,सांगोला युवा अध्यक्ष अक्षय भंडे, उपस्थित राहणार आहेत..
सांगोला तालुक्यातील वाणीचिंचोळे येथील समाज बांधवांनी एकत्र येऊन छान नियोजन केले बद्दल हटकर समाज महासंघाचे संस्थापक मा. भिमराव भुसनर पाटील, प्रदेश अध्यक्ष मा.राज हटकर पाटील उपाध्यक्ष मा. दिपकजी चोरमले कार्याध्यक्ष मा.विठ्ठल भंडे प्रसिद्धी प्रमुख प्रा.काशिनाथ निळे सर व सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष इतर पदाधिकारी यांचे वतीने अभिनंदन करतो व समाजातील मुलां मुलींनी जास्तीत जास्त वधु वर मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन हटकर समाज महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष सुरेश आण्णा पाटील यांनी केले.