मोखाडा :सौरभ कामडी
वाकडपाडा ता.मोखाडा येथे आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती च्या वतीने आयोजित केलेल्या लोकजागर व समाजातील गुणवंतांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हा परिषद शाळा वाकडपाडा येथे नवीन बांधण्यात आलेल्या स्टेज ला माजी आदिवासी विकास मंत्री व आदिवासी समाजाचे नेते निसर्गवासी वंदनीय मधुकरराव पिचड साहेब सांस्कृतिक कला मंच नामकरण करण्यात आले.
या कार्यकर्माचे अध्यक्ष स्थानी प्रदीप वाघ होते.
तर प्रमुख वक्ते म्हणून भरत गारे गुरूजी,.प्रियंका मेंरदे यांनी आदिवासी समाज संस्कृती व आद्य क्रांतिकारकांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.
तसेच
लोकजागर कार्यक्रमात आदिवासी समाजाचे लोकप्रिय गायक संदीप गवारी व मनोज गांगुर्डे यांनी आदिवासी गीतांच्या माध्यमातून समाज जागृती केली.
या कार्यक्रमात आदिवासी समाजाती आदर्श व गुणवंतांचा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रल्हाद काका कदम, डॉ मिठाराम कडव, पंचायत समितीच्या सदस्या आशा झुगरे, एकनाथ दरोडा, प्रभाकर पाटील, परीसरातील सरपंच, उपसरपंच, पत्रकार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित
होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश दाते, संजय वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठल गोडे व सुत्रसंचलन अभिनया वाघ हिने केले.