Type Here to Get Search Results !

भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार व कर्तव्यदक्ष माजी मंत्री मा. रविंद्रदादा चव्हाण यांची निवड

श्रोते हो, जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कोणता, असा प्रश्न उपस्थित झाला की पटकन भारतीय जनता पार्टीचं कमळ डोळ्यापुढं दिसतं. या पक्षाचा पसारा रोजच वाढत आहे आणि विकासाचा दृष्टिकोन असल्यामुळं रोज नवनवीन कार्यकर्त्यांची त्यात भर पडत आहे. प्रचंड प्रमाणात भाजपमध्ये 'इनकमिंग' सुरू आहे, तो भाग वेगळा ! 


तर श्रोतेहो, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आता भाजपानं डोंबिवलीचे आमदार आणि कर्तव्यदक्ष माजी मंत्री मा. रविंद्रदादा चव्हाण यांची निवड केलीय. सर्वात प्रथम मा. रविंद्रदादांचं मनापासून अभिनंदन करू या.

युवा मोर्चाचा नेता, नगरसेवक स्थायी समितीचा अध्यक्ष, आमदार राज्यमंत्री आणि मंत्री असा दिमाखदार प्रवास असणारा नेता म्हणजे मा. रविदादा ! रविदादा म्हणजे एक मोकळं ढाकळं, दिलखुलास आणि मनमोकळं व्यक्तिमत्व. प्रत्येक कार्यकर्त्याला हवंहवसं वाटणारं..अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये सतत मिसळणारा आणि रमणारा नेता. विकासासंदर्भात त्यांची दूरदृष्टी, त्यांची काम करण्याची प्रचंड क्षमता आणि वकूब.. त्याशिवाय, प्रत्येक कामाची शिस्तबद्ध तसंच नियोजनबद्ध आखणी सर्व परिचित आहे ! त्यांची ही वैशिष्ट्यं भाजपाच्या नेतृत्वानं अचूक टिपली आणि प्रथम त्यांना मंत्रीपद दिलं गेलं, मंत्रीपदी असताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली. त्यांची कर्तव्यतत्परता वरिष्ठांच्या लक्षात आली. एके दिवशी मा. रविदादा यांची उत्तुंग भरारी असणार हे त्याचवेळी लक्षात आले ! 

दिवस पुढं सरकत होते..एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कोकणातील काही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रविदादांकडं होतं. त्यांच्या कारकीर्दीत कोकणचा जो विकास झाला, तो खरोखर कौतुकास्पद ठरला. कोकणच्या विकासात रविदादांचा सिंहाचा वाटा होता, असंच म्हणा ना! त्यांच्या कर्तृत्वाची दखल संपूर्ण भाजपानं घेतली.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रविदादांच्या कारकिर्दीत १०५४ पूल बांधले गेले, तर १७९७ पूल प्रगतीपथावर होते. त्या काळात तब्बल २४ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले. ही त्यांची कामगिरी खरोखर कौतुकास्पद आणि अभिमानास्पद म्हणावी लागेल. हो ना!

सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी विकासाचा ध्यास घेतला होता आणि अशा रविदादांना आता मोठी संधी मिळाली आहे.. थोडक्यात काय, त्यांच्यासाठी काम करण्याची सर्व क्षितिजं खुली झाली आहेत. संपूर्ण जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडं चालून आलं आहे, हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही येत आहे. त्यामुळं शेतकरी, महिला आणि 
युवकांसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्ष खेडोपाडी पोहोचवणं त्यांना शक्य होणार आहे. 

श्रोते हो, आता या नवीन जबाबदारीमुळं पक्ष वाढीसाठी जे जे शक्य आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळणार आहे. आदरणीय नरेंद्रजी मोदी सरकारचे मोठमोठे प्रकल्प आदिवासीपाड्यापर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्ते घडवून महाराष्ट्रात एक इतिहास रचणार आहेत, याची अर्थात सर्वांना खात्री आहे आणि रविदादांना ते सहज शक्यही आहे ! 

ही झाली सर्व पार्श्वभूमी, श्रोते हो, आता आपण रविदादांचं मनापासून अभिनंदन करू या आणि त्यांच्या पुढील वाटचालीला आणि भरभराटीला मनापासून शुभेच्छा देऊ या ! 

हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. आपले मनापासून आभार आणि धन्यवाद !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News