Type Here to Get Search Results !

अवकाळी पावसाने डाळिंबावर रोगांचा प्रादुर्भाव... उत्पादक शेतकरी आर्थिक संकटा

" अवकाळी पावसाने डाळिंबावर रोगांचा प्रादुर्भाव... उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात.."

अतुल खूपसे पाटील यांच्याकडून सरकारी मदतीची मागणी....


या वर्षी कधी न्हवे ते मे मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने सगळ्यात जास्त फटका शेतकरी राजा ला बसला.यामध्ये डाळिंब शेती तर अक्षरशः मातीमोल झाली. डाळिंब शेती साठी लागवडी पासून ते तोडणी पर्यंत साधारणतः एकरी 3 ते 4 लाखांपर्यंत खर्च येतो . पण अवकाळीने यावर्षी डाळिंब बागेमध्ये तेलकट डाग, डांबरी डाग तसेच मूळकुज झाल्याने अक्षरशः पूर्ण बागा उखडून टाकण्याची नौबत शेतकऱ्यांवर आली आहे त्यामुळे मायबाप सरकारने बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 5 लाखांची मदत करून अश्या संकटकाळात त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे जनशक्ती शेतकरी संघटनेचे नेते श्री अतुल खुपसे पाटील यांनी यावेळी सांगितले.
या वेळी बोलताना ते म्हणाले की सोलापूर जिल्हा हा डाळिंब उत्पादनात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात देखील डाळिंब शेती ने शेतकऱ्याला चांगले दिवस दाखवण्याचे काम केलेले आहे. पारंपरिक ज्वारी चा जिल्हा आज शेतकऱ्यांच्या कष्टामुळे डाळिंब उत्पादकांचा जिल्हा बनला आहे. यावेळी मात्र निसर्ग राजा ची अवकृपा झाली आणि पावसाने मे मध्ये च आगमन केले ,परिणामी पीक धरण्यासाठी कष्ट करणाऱ्या डाळिंब उत्पादकांचा सगळा खर्च पाण्यात गेला. त्यामुळे शेतकऱ्यांमधून सरकारी मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे .
ते पुढे बोलताना म्हणाले की या हलाखीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांना कमीत कमी उत्पादन खर्च तरी मिळेल याची व्यवस्था करावी. सरकारी पंचनामे आणि मदतीची कार्यवाही लवकरात लवकर सुरू न झाल्यास प्रसंगी जनशक्ती शेतकरी संघटना सनदशीर मार्गाने आंदोलनाचा मार्ग अवलंबेल असे ही ते यावेळी बोलताना म्हणाले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News