Type Here to Get Search Results !

संघर्षातून समन्वय व समन्वयातून यशोगाथा-PSI गोदे साहेब

संघर्षातून समन्वय व समन्वयातून यशोगाथा-PSI गोदे साहेब

सेवानिवृत्तांचा सत्कार सोहळा, शाही विवाह सोहळा,हुंडा,सोने टाळा -हटकर समाजाची आदर्श आचारसंहिता..


महाराष्ट्र राज्यात विविध जाती धर्मातील लोक गुण्या गोविंदाने राहतात.त्यातच राज्यात अल्प प्रमाणात असलेला हटकर समाजाला कायम सर्वच बाबतीत उपेक्षित रहावे लागत आहे.समाजातील ग्रामीण भागातील अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय, निमशासकीय अशा अनेक ठिकाणी नोकरीत आहेत.त्यातील अनेक जेष्ठ सेवक म्हणून कार्यरत असलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांचा पंढरपूर येथील हटकर समाज मठात सेवानिवृत्ती निमित्ताने समाजातील लोकांनी एकत्र येऊन सत्कार करण्यात आला.समाजातील युवा पिढीला मार्गदर्शन करत असताना युवकांनी कोणतीही लाज न बाळगता मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करावा.तसेच शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे त्याप्रमाणेच भविष्यात शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये.गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सत्कार मूर्तींनी सांगितले.समाजातील युवकांनी एकत्र येऊन केलेला सत्कार समारंभ हा कायम स्मरणात राहील व युवा पिढीला एक आदर्श आणि योग्य मार्गदर्शन करणारा असेल असेही सत्कार मूर्तींनी सांगितले 

संघर्षातून समन्वय व समन्वयातून यशोगाथा PSI गोदे साहेब यांनी सांगितले.
समाजातील प्रशासकीय सेवेतील कर्मचारी, सेवक वर्ग, कामगार वर्ग यांचे संघटन करावे व सत्कारमूर्तींचे कार्य हे आदर्श असून सत्कारमूर्तीने संघर्षातून समन्वय व समन्वयातून यशोगाथा निर्माण केली असल्याचे मत पीएसआय गोदे यांनी व्यक्त केले ते सकल हटकर समाजाने आयोजित केलेल्या निवृत्त सत्कार सेवा समारंभात बोलत होते .समाजाने सर्व समाजाबरोबर मैत्रीपूर्ण रहावे, शिक्षण, आरोग्य, सामाजिक उपक्रम राबवत आधुनिकता स्वीकारावी उच्च विचार श्रेणी असलेल्या समाजाचा आदर्श ठेवावा.प्रत्येकाने व्यसन होणार नाही असे संस्कार करावे असे माजी सोलापूर जिल्हा कक्ष अधिकारी चंद्रकांत होळकर यांनी सांगितले .

सोशल मीडियाच्या व राजकिय खेळाच्या फंदात न पडता स्पर्धेच्या युगात दक्ष राहून शिक्षणापासून वंचित न राहता एक आदर्श विचार समोर ठेवून आपली भविष्यातील वाटचाल करावी.तरुण युवकांमध्ये भविष्य घडविण्याची ताकद असून एकत्रित येऊन समाज उपयोगी कार्य करावे .पालक व विद्यार्थी यांचा स्पर्धा परीक्षेसाठी समन्वय व संघटन करावे असे तुकाराम भूसणर सर यांनी सांगितले. तर 
हटकर समाजानेही विवाह संदर्भात आचारसंहिता जाहीर केली.हल्लीच्या काळात विवाह म्हणजे डामडौलच चालू आहे.मुला मुलींच्या लग्नासाठी अनेक पालकांनी कर्ज काढत शाही विवाह सोहोळा करण्याच्या नादात जमिनी विकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.कर्जबाजारीतून नैराश्य आल्याने अनेक पालकांना आत्महत्या देखील करावी लागली आहे.त्यामुळे शाही विवाह सोहळा,हुंडा छळ यातूनच मुलींनाच सर्वात जास्त त्रासाला जावं लागत असून काही नि आत्महत्या केल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.त्यामुळे हटकर समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन एक आदर्श आचारसंहिता जाहीर केली.त्याचे समाजातील सर्व नागरिकांनी पालण करून समाजाला आदर्श ठिकाणी ठेवावं असे आवाहन करण्यात आले.साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम एकाच दिवशी घ्यावा,कमी लोकात लग्न पार पाडावे ,कर्ज काढून शाही विवाह सोहळ्याचे खर्च टाळावे, डीजे व फेटे बंद करावे , हुंडा देणेघेणे टाळावे याप्रसंगी चंद्रकांत होळकर साहेब,तुकाराम भुसनर सर,ज्ञानदेव करवर, दशरथ यमगर यांचा सेवानिवृत्ती निम्मित्त सत्कार करण्यात आला.


महादेव पाटील सर, पैलवान नितीन निळे, शंभुराजे विनायक पाटील ,सद्गुरु माऊली बँकेचे अध्यक्ष मारुती भूसणर, दत्तात्रय चौगुले, मुकुंद व्हळगळ , हेमंत पाटील ,शंकर चौगुले, जयसिंग भूसणर ,आबासो पाटील ,राजू भूसणर ,व्हरगर गुरुजी, केशव पाटील ,संपादक नामदेव लकडे , भारत करवर , या प्रसंगी युवा नेते विजय मरगर यांनी प्रस्तावना केली तर भाजपा चे विजय भुसनर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News