दिनांक १३/०४/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता मौजे राजुरी ता.सांगोला येथे हटकर समाजातील युवा पैलवान अजय भिमराव भुसनर जांबुडकर यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ६१ किलो वजन गटात माती विभागात उपांत्य पुर्व फेरी पर्यंत चांगल्या कुस्ती केल्या बद्दल राजुरी गावचे सरपंच मा.दादा व्हळगळ मा.सरपंच रामचंद्र दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव मंदिर येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करुन पुढील कुस्ती क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी यावेळी हटकर व ओबिसी महासंघाचे अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील व युवा नेते मा.दत्ता खुळे मा.अनिल बंडगर मा.दगडु खुळे मा. ज्ञानेश्वर दबडे मा.विष्णू दबडे मा.सखाराम दबडे मा.दादा दबडे मा.भाऊसाहेब जुजारे हे मान्यवर मंडळी उपस्थित होते. या सत्काराचे आयोजन राजुरी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष व हटकर व ओबिसी महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा.सुर्यकांत खुळे साहेब यांनी केले होते.