कृष्णा विश्व विद्यापीठ येथ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उस्तवात साजरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कृष्णा विश्व विद्यापीठ येथे मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी प्रसिद्ध वक्ते रामभाऊ सातपुते तर प्रमुख उपस्थित मध्ये H.R.विभागाचे अधिकारी विक्रम शिंदे साहेब आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख D.M. पाटील साहेब यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली तसेच
जयंती कमिटी च्या वतीने सातारा येथील एहसास मतिमंद मुलाची शाळा यांना धान्य वाटप करण्यात आले तदनंतर कृष्णा हॉस्पिटल येथील उल्लेखनीय काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यामधे
डॉ.प्रणिता पाटील, स्मिता पाटील, देवदास फाळके,भगवान चव्हाण, लक्ष्मीकांत पवार, प्रकाश वाघमारे,संभाजी सोनटक्के या व्यक्तींचा समावेश होता सदर कार्यक्रमास D.M पाटील साहेब,विक्रम शिंदे सर,रामभाऊ सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले
या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये कृष्णा हॉस्पिटल मधील मोठ्या संख्येने कर्मचारी तसेच समिती मधील सर्व धम्म बांधव उपस्थित होते..