श्री मल्लू देवीची यात्रा निमज डोंगरावरील व घोरपडी तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली
घोरपडी , नीमज व इतर सर्व भागातील हजारोंच्या संख्येने भाविक भक्त व फुलेकरी फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी दिवशी सुगंधी फुलाचे दुरडा घेऊन विजापूर हून मोठ्या संख्येने प्रस्थान करतात. व अमावस्याला घोरपडी व निमज डोंगरावरील श्री स फुले अर्पण करतात .चैत्र शुद्ध पंचमीला गुरुवार दिनांक 3 /4/ 2025 रोजी पहाटे चार ते सहा पर्यंत देवीला दंडवत घालतात पुन्हा सकाळी सहा ते आठ पर्यंत महाआरतीचा कार्यक्रम आहे सकाळी 11 ते संध्याकाळी सात पर्यंत महानैवद्य व लहान मुलांचे जावळ काढणे रात्री नऊ ते पहाटे चार पर्यंत गोंधळी व ओविकार मंडळाचा कार्यक्रमआहे पहाटे चार ते सहा पर्यंत पालखी मिरवणूक सबिना सोहळा होणार आहे या यात्रेत यात्रेतील विविध प्रकारचे दुकाने असतात या यात्रेत महाराष्ट्र ,कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात . फुले करी व पुजारी
घोरपडी ते विजापूर साधारण 100 किलोमीटर अंतर पायी पार करतात. यात्रेच्या काळात आतषबाजी सुगंधी फुलाची सजावट व मंदिरावरील आकर्षक रोषणाई ,मल्लू देवीच्या नावाने जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करतात ही
यात्रा शांततेत व उत्साहात पार पडण्याकरता घोरपडी व नीमज गावचे ग्रामस्थ परिश्रम घेतात.