प्रतिनिधी विनोद धुमाळ जांबुड
जांबुड येथे ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी शिबिर
आज माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका शिंदे मॅडम यांच्या नेतृत्वात आणि बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज आयुष्यमान आरोग्य मंदिर जांभुड येथील आरोग्यविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी केली .
वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करणे आवश्यक आहे असे मत डॉ. नाईकनवरे यांनी व्यक्त केले .हिवाळ्याचे दिवस असल्याने सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढत आहे म्हणून जांबुड उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यसेविका ,आशाताई यांनी जांबुड क्षेत्रातील सर्व ऊसतोड कामगारांची तपासणी करून औषध उपचार केले तसेच समुदाय आरोग्य अधिकारी विशाल नाईकनवरे यांनी सरकारी योजनेबद्दल माहिती दिली .
आरोग्यसेविका नीता सावंत आणि यास्मिन मुल्ला यांनी गरोदर मातांना स्तनपान आणि नवजात बालकांची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी आशाताई उषा बिले,सुवर्णा क्षीरसागर, आणि गुरव मावशी यांचे सहकार्य लाभले.