Type Here to Get Search Results !

महाविकास आघाडीकडून सुनिल भुसारा यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

महाविकास आघाडीकडून सुनिल भुसारा यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज 

२८ तारखेला महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन 


मोखाडा : प्रतिनिधी सौरभ कामडी 
                 निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून काल २४ रोजी विक्रमगड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सुनिल भुसारा यांनी सर्वात अगोदर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना उबाठा, काँग्रेस, सीपीएम, कष्टकरी संघटना अशा सर्व पक्षांचे जिल्हा तालुका प्रमुख संघटना सचिव आदी उपस्थित होते. हा उमेदवारी अर्ज प्रातिनिधिक स्वरूपाचा भरलेला असून येता २८ तारखेला माझ्या माय बाप जनतेच्या उपस्थितीत शक्ति प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे यावेळी भुसारा यांनी सांगितले. 
        विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असून तशा हालचाली सुरू आहेत अशावेळी महाविकास आघाडीकडून भुसारा यांनी सर्वात आधी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असे असताना दुसरीकडे महायुती कडून अद्यापही उमेदवार आणि पक्षही ठरलेला नसल्याने महावीकास आघाडीच्या सुनिल भुसारा यांच्या विरोधात नेमका कोण उमेदवार असेल याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा कडून राज्य स्तरावरून उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्याचे चित्र असले तरी सुनिल भुसारा यांनी पक्षाच्या एबी फॉर्म सहित उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडी कडून अनेक जागांचे चित्र स्पष्ट झाल्याचे यातून दिसून येत आहे.
     यावेळी शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख निलेश गंधे, जिल्हा प्रमुख अनुप पाटील, काँग्रेस करून घनश्याम आळशी, जमशीद शेख, सीपीएम् चे सचिव किरण गहला, यशवंत बुधर, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लॉबो, महीला जिल्हा प्रमुख अंजली चौधरी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News