मोखाडा : सौरभ कामडी
पालघर जिल्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू आहे.त्यामध्ये दोन दिवसात ६ विधानसभा मतदार संघात एकूण ८५ उमेदवारी अर्ज विक्री झाली आहे.मात्र नामनिर्देशन पत्र एकही दाखल झाले नाही.त्यामध्ये सर्वात कमी १२९ विक्रमगड विधानसभा मतदार संघात नामनिर्देशन पत्र आतापर्यंत ४ अर्जाची विक्री झाली असून त्यामध्ये मोखाडा तालुक्यातील प्रदीप वाघ यांनी देखील बुधवारी उमेदवारी अर्ज घेतला असून पुढील दोन ते तीन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
विक्रमगड मतदारसंघातून शिवसेना पक्षाकडून इच्छुक असलेल्या उपसभापती प्रदीप वाघ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली असल्याचे स्पष्ट केले त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की विक्रमगड विधानसभा निवडणुक लढण्यास मी तयार असल्याचे मीडियातील चर्चा म्हणून संदर्भित केले.