आपला भारत देश लोकसंख्येच्या बाबतीत जगात एक नंबर ला असून कुस्ती साठी प्रसिद्ध असूनही दर वेळी ऑलिंपिक स्पर्धेत कुस्ती मध्ये एक ही सुवर्ण पदक मिळत नाही हे किती दुर्दैव म्हणावे लागेल.यास राजकीय नेते मंडळी जबाबदार आहेत. ज्या पैलवानांना बोगस कागदपत्रे तयार करून स्पर्धेत सहभागी करणारे शिक्षण संस्थाची परवानगी कायमची रद्द करण्यात आली पाहिजे.या साठी लवकरच हटकर समाज महासंघाचे वतीने कुस्ती कमिटी तयार करून मुख्यमंत्री यांचे कडे जाणार असल्याचे म्हटले. महाराष्ट्रात शालेय कुस्ती स्पर्धेत बोगस कागदपत्रे तयार करून स्पर्धेत सहभागी होणारे पैलवानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे चांगले पैलवान बाद होऊ लागले आहेत.यासाठी जबाबदार असणारे शिक्षक,कुस्ती कोच,कुस्ती स्पर्धा आयोजक यांचे वरती कायदेशीर कारवाई केल्यास हे सर्व बोगस कागदपत्रे तयार करून स्पर्धेत सहभागी होणारे पैलवान भविष्यात बंद होतील व खरे कुस्ती मेहनत करणारे हुशार पैलवान घडतील आणि ऑलिंपिक स्पर्धेसाठी संघर्ष करून सुवर्णपदक आणतील यासाठी सर्व कुस्ती शोकिंनांनी पुढे येऊन आवाज उठवला पाहिजे.
कुस्ती साठी पंजाब हरियाना पेक्षा ही चांगले पैलवान महाराष्ट्रात आहेत.पण त्यांना मदत सहकार्य करण्यापेक्षा कुस्तीत राजकारण केले जाते. सध्या तर ग्रामीण भागातील कुस्ती मैदानात जातीचे राजकारण करू लागले आहेत पैलवांनाना चांगले पैसे मिळत असतील तर तेथे दलाल तयार झाले आहेत. कुस्ती दलाल व निवेदक यांनी कुस्ती कमिटीला गोड बोलून आपले पाकीट ठरवायचे कुस्ती मैदान आपल्या ताब्यात घ्यायचे आणि गरीब कुटुंबातील पैलवानांना मिळणारे पैसे मिळू देत नाहीत.मैदान चालू झाले कि चांगले कुस्ती मैदानात चालू असली तरीही त्यावर न बोलता कुस्ती निवेदक आणि दलाल यांनी एकामेकांची स्तुती करायची.हे सर्व महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहे.हे कधी बदलणार आजच्या परिस्थिती कुस्ती दलाल व निवेदक पैलवांना पेक्षा जास्त पैसे कमवायला लागलेत चारचाकी वाहनानेे येतात तर पैलवांना भाड्याच्या गाडीत मैदानला जावे लागते.हे कधी बदलणार. कुस्ती मैदान आयोजित करणारे कुस्ती कमिटी ने लक्ष देणे गरजेचे आहे.एखादा पैलवान हजार वर खेळत असेल तर ह्यांनी पाचशे रुपयात खेळवायचा.नाही तर त्यांची कुस्तीच लावायची नाही.त्याला दम द्यायचा. त्यात राजकारण करायचे आपल्या तालमीतला आहे चांगले पैशावर कुस्ती लावायची.बाहेरून कुस्ती शौकींनानी कालवा केला कि दादागिरीची भाषा वापरायची असले प्रकार कुठे तरी थांबले पाहिजे.तरच कुस्ती ला चांगले दिवस बघायला मिळतील.
महाराष्ट्रातील पैलवान भारतात कुठे ही जाऊन कुस्ती जिंकून येत आहेत.मग अशा पैलवांना साठी सरकार ने योग्य नियोजन करून त्यांना प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत करून तो खेळाडू ऑलिंपिक स्पर्धेसाठी तयार झाला पाहिजे यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.
आजपर्यंत अनेक जण महाराष्ट्र केसरी हिंद केसरी झाले पण ऑलिंपिक स्पर्धेत कोणीही सुवर्णपदक आणले नाही.
पैलवानांची इच्छा होती पण त्या वेळी योग्य मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य न मिळाल्याचे किती तरी पैलवान बघायला मिळतील. कुस्ती स्पर्धेत राजकीय नेते मंडळी नी हस्तक्षेप करायचे त्यांनी सांगितले तसं स्पर्धेचे नियोजन करायचे.आपल्या जवळचा पैलवान बोगस कागदपत्रे तयार करून स्पर्धेत खेळवायचा. एखाद्या कुस्ती संघटनेने विरोध केला तरी आपलेच खरं असल्याचा दावा करायचे.या सर्व गोष्टी मुळे चांगले पैलवान कुस्ती क्षेत्रातुन बाद होऊ लागेल आहेत.त्यामुळे सर्व कुस्ती वर प्रेम करणारे बांधवांनी आप आपल्या भागात आवाज उठवला पाहिजे.अशी विनंती कुस्ती वर प्रेम करणारे भिमराव भुसनर पाटील यांनी व्यक्त केले.