उपसभापती प्रदीप वाघ याचे प्रतिपादन
मोखाडा: सौरभ कामडी
आपण कोरोना मधील परिस्थिती बघितली मोठं मोठे उद्योग, नोकरदार सर्व ठप्प झाले अखेर सगळ्यांना मातीचाच आधार घ्यावा लागला मात्र शेतकरी खऱ्या अर्थाने आपले काम करीत होता, यामुळे आजच्या घडीला शाश्वत व्यवसाय हा शेतीच आहे. शेती हा बापाचा धंदा आहे पापाचा नाही असे प्रतिपादन मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी केले,१५वा वित्त आयोगाच्या निधीतून वाघ यांनी शेतकरी प्रशिक्षण मेळावा घेवून एक नवीन आदर्श देखील निर्माण केला आहे यावेळी रेशीम उद्योग अधिकारी तसेच कृषी मंडळ अधिकारी आणि शेतकरी मोठ्या प्माणावर उपस्थित होते.
यावेळी वाघ यांनी पुढे सांगितले की आज घडीला आपली पारंपारीक शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आह नागली उडीद या पिकांचे तर अतोनात नुकसान झाले आहे यामुळे आता आपल्याला या शेतीत नवनवे प्रयोग करणे गरजेचे असून त्यासाठी ही रेशीम शेती देखील एक वरदान आहे. तसेच शेती हा माझा आवडता विषय असून दगड सिमेंट रेती पेक्षा या मातीवर माझे जास्त प्रेम आहे असे सांगत ठेकेदारी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना टोला देखील लगावला.यावेळी खोडाळा विभागातील गोमाघर सूर्यमाळ येथील शेतकऱ्यांनी रेशीम लागवड केल्याने येथील शेतकऱ्यासाठी त्या बाबत अधिक माहिती मिळावी यासाठी हे प्रशिक्षण मेळावा घेण्यात आला याचे तुती लागवड कशी करावी याचा फायदा त्यासाठी लागणारा खर्च याबाबत रेशीम उद्योग अधिकारी यांनी माहिती दिली. तर मंडळ अधिकारी सोळूखे यांनी शेती व्यवसायात शेतकरी राजा आहे यामुळे त्या पद्धतीने शेती करणे आवश्यक असून विभागवार माती त्याची खोली यामध्ये फरक असतो तसेच पाणी उपलब्धता देखील महत्त्वाचा विषय असून त्यानुसार पिके घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी पत्रकार हनिफ शेख यांनी कोणत्याही कामात संयम अतिशय महत्त्वाचा असून नुसते अनुदान किंवा कागद रंगवण्यासाठी नको तर खऱ्या अर्थाने शेती करा याचे मोठे फायदे आहे असे सांगितले जर तुम्हीच शेती करणार नसाल तर भावी पिढी कशी शेती करेल यामुळे त्यांच्या समोर तुम्हाला एक आदर्श तयार करावा लागेल तेंव्हाच ही शेती टिकेल असे त्यांनी सांगितले यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास गोमघर सरपंच सुलोचना गारे, सूर्यमाळ सरपंच गीता गवारी आरोहण संस्थेचे नितेश मुकणे, पत्रकर ज्ञानेश्वर पालवे,वामन दिघा, नामदेव ठोंबरे आदी उपस्थित होते.