बीड/परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पोहरागड येथे नगारा भावनाचे दि.०५ ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील विविध मान्यवर व संत महंतांच्या आणि धर्मजागरणच्या वतीने वरील सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्यास देशभरातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने पारंपारिक वेशभुषा करुन वाजत-गाजत सहभागी होणार आहेत. जिल्हाभरातून हजारो बंजारा बांधव जाणार असून या सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना शासकीय समितीचे बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब (पप्पु)चव्हाण यांनी केले आहे.
देशभरातील बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरागड येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री संजय राठोड, बंजारा समाजाचे धर्मगुरु बाबुसिंगजी महाराज, जितेंद्र महाराज, सुनिल महाराज, कबीरदास महाराज, सुरेश महाराज, गोपालचैतन्य महाराज, शामचैतन्य महाराज व धर्मजागरण मंच आणि समाजाच्या विविध संघटनेच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या नगारा भवनाच्या उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. पोहरागड येथील बंजारा समाजाच्या गौरवशाली इतिहासाची नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी तीर्थक्षेत्र पोहरागड येथे पालकमंत्री ना.संजय राठोड यांच्या प्रयत्नाने विरासत ए बंजारा संग्रहालय उभारले जात आहे.पोहरागड येथील नगारा भवनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेरा गॅलरीमध्ये रचला गेलेला बंजारा समाजाचा इतिहास चार मजल्याचा विरासत ए बंजारा वास्तु संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. प्रत्येक गॅलरीत विविध प्रकारचे देखावे आणि चित्रांच्या सहाय्याने बंजारा समाजाचा संपूर्ण इतिहास रचला गेला असून या भवनाच्या उद्घाटन होणार आहे.
बंजारा समाजाचे नेते तथा मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून जगातील पहिले बंजारा विरासत नगारा या आंतराष्ट्रीय संग्रहालयाचा भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे. जवळपास ७०० कोटी रूपये खर्च करून महायुती सरकारने हे पोहरादेवीचे संग्रहालय बांधण्यात आले आहे. बंजारा समाजाची काशी पोहरादेवीचा विकास जागतिक दर्जाचा तीर्थस्थानाच्या धर्तीवर होत आहे. संत सेवालाल महाराज मंदिर, जंगदबा देवी मंदिर,संत रामवराव बापू समाधी, जेठालाल महाराज मंदिर व सामकी माता मंदिर या गौर बंजारा समाजाच्या तीर्थक्षेत्राचा विकास कार्य प्रगतीपथावर पूर्ण झाले. सेवा ध्वजाची स्थापना, संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण जवळपास ५९३ कोटी रूपयाचा विकास महायुती सरकारने केले. तरी बंजारा बांधवानी अशा ऐतिहासिक आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी व सर्व संघटनातील पदाधिकाऱ्यांनी व माता भगिनांनी उपस्थित राहून याचे साक्षीदार व्हावे असे आव्हान वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना शासकीय समितीचे बीड जिल्हाध्यक्ष बाळा साहेब (पप्पु)चव्हाण यांनी केले आहे.