नांदा फाटा प्रतिनिधी! महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यावतीने सुरू असलेल्या विविध शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये 14 वर्षाखालील मुलींचा हॉकीचा संघ आरमोरी क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या विभागीय स्तरावर नागपूर महानगरपालिका संघाला धूळ चारित राज्यस्तरावर नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान आदित्य बिर्ला पब्लिक स्कूलने मिळवला असून अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये हॉकी प्रशिक्षक तसेच विद्यालयाचे शारीरिक शिक्षक भूपेश काळे किरण त्रिमूर्ती यांच्या मार्गदर्शनात संघनायक प्रियांसी येडे सोबत हर्षाली गोंडे श्रावणी खणके देवयानी धाबेकर दीक्षा गोवार दिपे हिमानी सूर आराध्या खिरटकर दिव्या धानोरकर विना गजघाटे अवनी कोतपल्लीवार उर्वशी प्रसाद देव नंदना दिलीप कुमार पूर्वी रिठे प्राची घोडे या खेळाडूंचा समावेश असून कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली असून त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्राचार्य संगीत सोनी विद्यालयाचे सर्व शिक्षक क्रीडा संयोजक व खेडप्रेमींनी अभिनंदन केले आहे