दिनांक 30/09/2024 रोजी सकाळी 11:00 वाजता शासकीय कार्यालया समोर सकल हटकर धनगर समाजाच्या आरक्षण अमलबजावणी करण्यात यावी म्हणून हटकर समाज महासंघाचे वतीने एकदिवसीय उपोषण आयोजित करण्यात आले.
महाराष्ट्रात दोन नंबर ला असणारा गरीब धनगर समाजाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणाची अमल बजावणी करण्यात यावी म्हणून हटकर समाज महासंघाच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष सौ.मा. स्वातीताई हटकर पाटील यांचे सह महासंघाचे पदाधिकारी व समाज बांधव यांचे उपस्थितीत बोदवड येथे शासकीय कार्यालया समोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले.
हटकर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा.भिमराव भुसनर पाटील व प्रदेश अध्यक्ष मा.राज हटकर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलन उपोषण व शासकीय अधिकारी यांना निवेदन देऊन धनगर समाजाचे हक्काचे दिलेले आरक्षणाची महाराष्ट्र सरकार अमलबजावणी करत नाही. तो पर्यंत हा लढा चालूच राहिल.राजकीय नेते मंडळी धनगर समाजाचा मतापुरता वापर करून घेत आहेत. आरक्षण मुद्दा म्हटलं कि आम्हाला निवडणूकीत सहकार्य करा. सत्तेत आले की पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणाची अमलबजावणी केली जाईल म्हणून जाहिर केले दोनदा सत्तेत आले पण आरक्षणाचा मुद्दा वर न बोलता मुग गिळून गप्प आहेत.धनगर समाज कोणत्याही पक्षाच्या बांधिलकीत नाही. त्यामुळे आमच्या हटकर धनगर समाजा च्या हक्काचे आरक्षणाची अमलबजावणी जो पक्ष करेल. त्या पक्षाला येणारे विधानसभा निवडणूकीत समाज सहकार्य करेल.असे मत
उपोषणकर्त्या रणरागिणी
हटकर समाज महासंघाचे महिला अध्यक्ष मा.सौ.स्वातीताई हटकर पाटील यांनी मांडले