मोखाडा :- वार्ताहर सौरभ कामडी
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सवा निमित्त (ईद-ए-मिलाद) मोखाडा शहरात लहान मुलांचे तथा शहरातील मुस्लिम नागरिकांनी जुलूस (मिरवणूक) काढून जल्लोषात सण साजरा करण्यात आला.
शहरातील मुस्लीमबहुल भागात समाजबांधवांकडून आपआपल्या परिसरासह घरे, दुकानांवर सजावट करण्यात आली होती, यामुळे मोहल्ल्यांचे रूप पालटल्याचे चित्र होते. दरम्यान दुपारी बालकांसह मोठेही सुन्नी जामा मस्जिदपासून एस. टी. बस स्टँड पर्यंत , असा जुलूस काढत कशिदा गायन करत ईद ए मिलाद सण उत्साहात साजरा करण्यात आला.
दरम्यान जशने ईद मिलाद कमेटी यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात 100 रुग्णांना वाटप करण्यात आले जशने ईद मिलाद कमेटी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट यांच्या हस्ते फळ भिस्कीट ors वाटप केले.
तसेच सायंकाळी लंगर (भंडारा) चे आयोजन करण्यात आले होते. बुधवार ईद-ए-मिलाद निमित्त सुन्नी जामा मस्जिद परिसरात युवा वर्गा कडून वतीने सजावट करण्यात आली होती.
हा मोहोत्सव शहरभर चौका चौकात रोषणाई व झेंडे लावून साजरा करण्यात आला, यावेळी सर्वपक्षीय नेते, पोलीस प्रशासन यांनी उत्तम बंदोबस्त ठेवण्यात आले होते व शांतता प्रिय हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या सण उत्साहात साजरा झाला.सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट चे अध्यक्ष हाजी गुलाब मणियार, जशने ईद मिलाद कमेटी चे अध्यक्ष जमशिद (लारा ) शेख जशने ईद मिलाद कमेटी चे कार्याध्यक्ष हाजी आरिफ शेख, जशने ईद मिलाद कमेटी चे कार्याध्यक्ष समीर (जम्मू )मनियार.