श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत कार्यालय देवडे ता.पंढरपुर या गावांमध्ये प्रभात वेलनेस सेंटर व आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त सरपंच सौ.प्रमिला सोमनाथ झांबरे यांच्या कडुन गावातील ग्रामस्थांनसाठी मोफत पायाचा मसाज म्हणजे संपूर्ण शरीराला मसाज करून देण्यात आला.
गावातील 100 हुन जास्त महिला व पुरुष यांनी पायाचा मसाज करून घेतला.यामध्ये शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, डोळ्यांच्या स्नायुंना चालना मिळण्यासाठी,पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी,पायावरची सुज कमी करण्यासाठी, गावातील ग्रामस्थांनसाठी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये आदर्श सरपंच सौ.प्रमिला झांबरे यांनी मोफत शिबीर घेतले.यावेळी DVP ग्रुपचे कार्यकारी संचालक मा.अमर पाटील,व्होळे गावचे नेते मा.योगेश व्होळकर, सरपंच प्रतीनिधी मा.सोमनाथ झांबरे,मा.नागनाथ लांडे,मा.विष्णु भोसले,मा.समाधान भोई,मा.ज्ञानेश्वर सुतार,मा.अशोक झांबरे,मा.महादेव शिंदे,मा.नामदेव झांबरे,मा.कुबेर झांबरे मा.बापुराव गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन आदर्श सरपंच सौ.प्रमिला सोमनाथ झांबरे यांनी केले होते.कार्यक्रमाचे परिश्रम मा.अभिजीत आबा पाटील मित्र परिवार यांनी घेतले.