प्रतिनिधी विनोद धुमाळ जांबुड
■ प.पू. श्री. ओंकारनाथ देवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र रांझणी देवाची ता. माढा येथील ज्योती वसंत चव्हाण यांची नुकतीच म हाराष्ट्र लोकसेवा आयोग (चझङउ) परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक (झङख) पदी निवड झाली आहे.
ज्योती चव्हाण यांचे शिक्षण जि.प.प्रा. शाळा रांझणी, छत्रपती शिवाजी विद्यालय भिमानगर, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय इंदापूर या ठिकाणी झाले आहे.
ज्योती चव्हाण या मागील वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुंबई येथे मंत्रालयामध्ये लिपिक या पदावर कार्यरत आहेत. अन् वर्षभरातच
दूसरे उज्वल यश संपादन करीत पोलीस उपनिरीक्षक या पदावर विराजमान झाल्या आहेत. अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या, सामान्य परिस्थितीतील
एका शेतकऱ्याच्या मुलीने मि ळवलेल्या यशाचे कौतुक होत आहे. तसेच रांझणी सह इंदापूर व टेंभुर्णी पंचक्रोशीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे