प्रतिनिधी मैनोदिन सौदागर निगंनुर :
ढाणकी आणि बंदी भागाच्या समस्या साठी डॉ विजय कवडे यांचे ढाणकी येथे अमरण उपोषण. त्यांनी प्रशासनाला पुढील समस्यासाठी निवेदन दिले आहे.
ढाणकी मध्ये नळाला एक दिवस आड पाणी सोडणे , ढाणकी येथे टेंमेश्वर नगर असून तेथील नागरीकांना नमुना आठ मिळने सर्व रस्ते, तात्काळ दुरुस्त करण्यात यावे, बंदी भागातील नागरीकांचे वर्ग 2 ची जमीन वर्ग करण्यात यावी, व बंदी भागातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. ढाणकी येथील मंजुर झालेले घरकुल त्वरीत देऊन त्यांना घरकुलांचा लाभ देण्यात यावा, नदी काठील शेतकर्यांना शासनामार्फत पाईपलाईन देण्यात यावी व तसेच गोरगरीब वंचितांना तात्काळ धान्य देण्यात यावे.या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या, यासाठी डॉ विजय कवडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते पण निवेदन देऊन सुद्धा या विषयाकडे प्रशासनाने अजून काही दखल घेतल्यानसल्यामुळे निवेदन मध्ये दिलेल्या इशारा नुसार दिनांक 10 ऑगस्ट 2024 पासून ढाणकी येथे अमरण उपोषणास बसणार आहे.