● मोखाडा पोलिसांची विद्यार्थी पोलीस सवांद
मोखाडा :सौरभ कामडी
खोडाळा : एखादे अभियान यशस्वीपणे राबविण्याचे प्रभावी माध्यम असलेल्या शाळा - महाविद्यालयात केंद्र सरकारने तीन नवीन कायद्यांमध्ये सुधारणा करून ते संमत केले आहेत. त्या कायद्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यासही सुरुवात झाली आहे. या कायद्यांची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, तसेच प्रसार व्हावा यासाठी मोखाडा पोलिसांनी मोहिते महाविद्यालयात कार्यशाळेचे अयोजन करून पोलीस व विद्यार्थी चर्चासत्र संवादाचे आयोजन केले होते.
या चर्चासत्राला प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
भारत सरकार भारतीय दंड संहिता १८६० ऐवजी भारतीय न्याय संहिता २०२३, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ऐवजी सुरक्षा संहिता २०२३ आणि पुरावा कायदा १८७२ ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम २०२३ प्रमाणे या तिन्ही कायद्यात बदल केला आहे. हे तिन्ही कायदे १ जुलैपासून देशात लागू करण्यात आले आहेत.
यावेळी मोखाडा पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे यांनी नवीन कायद्यांबाबत विद्यार्थी तसेच शिक्षकांना माहिती देऊन शंका समस्यांचे निराकरण केले. तसेच आपल्या आदिवासी भागात अल्पवयीन मुलींचे विवाह होत असेल तर सुजाण नागरिक म्हणून आपण पुढाकार घेऊन थांबवावा असे आवाहन केले. यावेळी पोक्सो, वाहतुकी संदर्भातील कायदे, मानवी हक्क आदीबाबत पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे यांनी मार्गदर्शन केले.
या कायद्यांची माहिती देण्यासाठी पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या आदेशान्वये व मोखाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, पोलिस उपनिरीक्षक विकास दरगुडे, पोलिस उपनिरीक्षक संजय भुसाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. यशवंत शिद, प्रा. तुकाराम रोकडे, प्रा. प्रवर्तन काशीद, प्रा. नवनाथ शिंगवे, प्रा. माधुरी अहिरे, प्रा. रघुनाथ मोरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.