मोखाडा :सौरभ कामडी
विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण मिळावे यासाठी माऊली ग्रुप डोंबीवली यांनी आदिवासी भागातील शाळांना स्मार्ट टिव्ही चे वाटप करण्याचे आदर्श काम हाती घेतले आहे.
त्याचाच भाग म्हणून वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेत स्मार्ट टिव्ही भेट देण्यात आली.
यावेळी माऊली ग्रुप चे चारुदत्त कोलारकर यांनी सांगितले की आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य देऊन येथील विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन पुढे जातील अशी अपेक्षा आम्हाला आहे त्या साठी आम्ही आमच्या परीने जे काही साहित्य उपलब्ध होईल ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत
माऊली ग्रुप च्या दातृत्वा बदल प्रदीप वाघ उपसभापती यांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी प्रदीप वाघ उपसभापती, चारुदत्त कोलारकर, कोलारकर मॅडम, नंदकुमार वाघ उपसरपंच, विठ्ठल गोडे पोलिस पाटील, संतोष बोंद्रे माऊली ग्रुप चे सदस्य, सुहास दिनकर मुख्याध्यापक,नागु विरकर केंद्र प्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.