ह. मंगेवाडी प्रतिनिधी आबासाहेब शेवाळे
सांगोला तालुक्यातील डोंगराळ परिसरात असणाऱ्या ह. मंगेवाडी या गावांमध्ये डोरले अक्वा इंडस्ट्री कडून सन 2024 मध्ये एस.एस.सी परीक्षेत 75 टक्के होऊन अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर सत्कार डोरले अक्वा इंडस्ट्रीजकडून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्रा.बाळासाहेब शितोळे (महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रूकडी कोल्हापूर )यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. या सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलताना डोरले अक्वा इंडस्ट्रीजचे मालक बापूसाहेब डोरले व ज्ञानेश्वर डोरले यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे अडचण आल्यास डोरले अक्वा इंडस्ट्रीमार्फत त्यांचे अडचण दूर करण्यात येईल, असे संबोधण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शोभा आवडाप्पा भुसनर (सरपंच), महादेव भुसनर, तेजस सुतार , प्रकाश पाटील (पोलीस पाटील) सुदाम भुसनर (मेजर,), गणपत शेवाळे( मेजर), भैरू डोरले, ब्रम्हनाथ भुसनर (आदर्श करिअर अकॅडमी सांगली) तानाजी भुसनर, दिपाली भुसनर (शिक्षक) कलावती भुसनर , ( अंगणवाडी सेविका),यशवंत भुसनर,अमोल जाधव .सर्व विद्यार्थी ,पालक ,ग्रामस्थ,तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.