प्रतिनिधी विनोद धुमाळ जांबुड
देशभरात आयुष्मान भव ही महत्वकांक्षी मोहीम दि. 17 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत रबावली होती. सदर मोहिमेचा उद्देश हा गावपातळीवर गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा- सुविधा पुरवणे व जनजागृती करणे हा होता.सदर गती पुढे नेण्यासाठी आर्थिक वर्ष 2024 -25 या वर्ष्यामध्ये आयुष्मान आरोग्य मंदिर स्तरावर आठवड्यातून एकदा म्हणजे प्रत्येक शनिवारी आयोजित करण्यास सांगितल्याप्रमाणे आज दिनांक 27 जुलै शनिवार रोजी माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली "आयुष्मान भव:" आरोग्यविषयक विशेष मोहीम राबविणयात आली ह्या कार्यक्रमाअंतर्गत 18 वर्षावरील सर्व उपस्थित नागरीकांची रक्त तपासणी,बी.पी तपासणी, शुगर तपासणी, सर्वांचे वजन, उंची करण्यात आली तसेच गरोदर मातांची आरोग्यतपासनी करण्यात आली .
शिबिरातील तपासणी केलेल्या रुग्णांना आरोग्यतपासणी चे महत्व पटवून दिले आणि ज्या रुग्णांना जास्त त्रास होत आहे अश्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव या ठिकाणी पाठवण्यात आले.
ह्यावेळी मा.उपसरपंच नारायण काका पाटील, प्राध्यापक सुमित भोसले सर, पत्रकार विनोद धुमाळ,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल नाईकनवरे आरोग्य सेविका नीता सावंत, आशाताई उषा बिले ,सुवर्णा क्षीरसागर,राणी पिसे,रंजना गुरव व परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते.