मोखाडा :सौरभ कामडी
जव्हार: १८ जुलै पासून कोसळणाऱ्या संतत धारेने
जव्हार तालुक्यातील झाप मार्ग ते मांगेलवाडा पासून चोथ्याची वाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाली आहे, दरम्यान पोंढीचा पाडा गावानजीकच्या पुलाला साधारण साडेतीन फूट व्यासाचे भगदाड पडले असून अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला आहे, भगदाड मोठे असले तरी पाणी साठते म्हणून अपघाताची शक्यता वाढली आहे.
गेल्या काही वर्ष भरापासून एस आकाराच्या वळणात रस्ता खचला आहे, परंतु त्यावर अद्याप कोणतीही उपाय योजना करण्यात आली नाही . येथील परिस्थिती पाहता या ठिकाणी जर संरक्षण भिंत बांधली नाही , रस्ता खचून या भागातील वाहतूक बंद होईल.परिणामी या भागातील शाळकरी मुलं व रुग्ण यांची परचंड हाल होतील.
रात्रीच्या पावसामुळे जव्हार झाप रस्त्यावर असणाऱ्या पौढीचापाडा पुलावर मोठे भगदाड पडले आहे व कालपासून या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यामुळे या भागातील रस्ता बंद झाला आहे यामुळे या भागातील ५ ग्रामपंचायत,१ प्राथमिक आरोग्य केंद्र,८ पथके,२ आश्रम शाळा,३५ जिल्हा परिषद शाळेचे मार्ग बंद झाल्याने शिक्षकाची व विद्यार्थ्याची शिक्षणाचे तीन तेरा झाले आहेत.गेल्या अनेक दशकांपासून ही समस्या असताना लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत.या आदिवासी जनतेला कोण न्याय देईल? डिजिटल इंडिया कागदावरच राहील की काय? अशी शंका या भागातील वृध्द नागरिक करीत आहेत.
पोंढीचा पाडा पुलाची उंची वाढावी म्हणून गेल्या २५ वर्षांपासून मागणी केली जात आहे, परंतु सरकारी बाबू आणि लोकप्रतिनिधींची नकार घंटा मुळे येथील जनता विकासापासून कोसो दूर राहिली आहे.पायाभूत सुविधेकरिता साधा रस्ता या भागात बनवता येत नाही? खेदाची बाब आहे.
वंदना ठोंबरे, सदस्य, कौलाळे ग्रामपंचायत
आज दिनांक.२३ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार,तहसीलदार कार्यालय जव्हार,गटविकास अधिकारी पंचायत समिती, यांना पोंढीचा पाडा येथील
पुलाच्या समस्येबाबत निवेदन दिले आहे. तूर्तास पुलाला पडलेले भगदाड त्वरित बुजवून रस्ता रहदारिसाठी खुला करावा, शिवाय, कायमस्वरूपी इलाज म्हणून या पुलाची उंची वाढविण्यासाठी तजवीज करण्यात यावी. अन्यथा जव्हार तालुका बहुजन विकास आघाडी व या भागातील ५ ग्रामपंचायत मधील नागरिक येत्या १५ ऑगस्ट रोजी पौढीचापाडा पुलावर आमरण उपोषण करतील.
एकनाथ दरोडा,अध्यक्ष, जव्हार तालुका. बहुजन विकास आघाडी