मोखाडा :सौरभ कामडी
आज कारेगाव आश्रमशाळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कु.प्रेम गोंविद कामडी करोळ येथील विद्यार्थी ठाणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवत शिष्यवृत्ती परीक्षा पास झाला आहे.
तसेच शासकीय आश्रमशाळा कारेगाव येथील विद्यार्थ्यांनी कु.दामीनी फसाळे तनुजा कामडी, गौरी झुगरे, कोचाळे हिने देखील आदिवासी विकास विभाग ठाणे मधुन द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.
इतरही विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले असून सर्वांचे आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती च्या वतीने व पत्रकार संघ मोखाडा तालुका यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी समीतीचे अध्यक्ष प्रदीप वाघ, कार्याध्यक्ष मंगेश दाते, सरपंच नरेंद्र येले, सदस्य निलेश झुगरे, पत्रकार संघ अध्यक्ष ज्ञानेश्वर पालवे, उपसरपंच नंदकुमार वाघ,मोहन मोडक, निलेश ठोमरे, अनंता वारे, संजय वाघ, संजय हमरे, संतोष पाटील, पत्रकार गणेश वाघ,मनोज काळी, गोविंद कामडी, विजय ठोमरे,अभिनया वाघ,तेजल वारे, जीवन वाघ, केंद्र प्रमुख नागु विरकर, पवार सर उपस्थित होते.