मोखाडा :सौरभ कामडी
शिक्षण क्षेत्रात होणारे बदल ,शासन स्तरावर राबविले जाणारे विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि ह्या उपक्रमांची माहिती शिक्षकांपर्यंत पोहचून शाळा स्तरावर त्यांची प्रभावी आमल बजावणी साठी आज दिनांक 27/7/2024 रोजी किनिस्ते केंद्राची केंद्र स्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद iso शाळा कोचाळे येथे पार पडली .
शिक्षण परिषदेचा आढावा घेण्यासाठी मोखाडा पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी वसंत महाले साहेब यांनी सकाळीच हजेरी लावली व मार्गदर्शन केले . शिक्षण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या तथा शिक्षण समिती सदस्या कुसुमताई झोले मॅडम, पंचायत समिती मोखाडा माजी सभापती तथा विद्यमान उपसभापती प्रदीप वाघ साहेब उपस्थित होते वाघ साहेबांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले . . तसेच तज्ञ मार्गदर्शक म्हणून दिलीप बांगर सर यांनी tlm अध्यापनात शैक्षणिक साहित्याचे महत्व तर श्रीम. कांचन सोनटक्के मॅडम यांनी आनंददायी शनिवार उपक्रम यावर मार्गदर्शन केले . केंद्राचं केंद्रप्रमुख नागू वीरकर यांनी इत्तर विषय आणि प्रशासकीय विषयावर मार्गदर्शन केले . पाहुण्यांच्या स्वागता साठी व शिक्षकांच्या स्वागतासाठी शाळेतील मुलांनी इकोफ्रेंडली कागदी सुंदर बॅच तयार केले मुलांचे सर्वांनी कौतुक केले . शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक राजाराम जोशी . गणेश वाघ सर यांनी शिक्षण परिषदेचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन केले होते.