मोखाडा :सौरभ कामडी
खोडाळा : मोखाडा तालुक्यातील बोटोशी ग्रामपंचायत हद्दीत पाथर्डी (रामवाडी ) येथील जयराम सोनू नडगे ह्या आदिवासी कुटुंबाचे ऐन पावसात 11 जुलै रोजी सायंकाळी चार च्या सुमारास घराला लागलेल्या आगीत साठवून ठेवलेले धान्य, जीवनावश्यक वस्तू महत्वाचे कागदपत्रे, कपडे व इतर वस्तू जळल्याने मोठ्या प्रमातात नुकसान झाले होते सदर घटना वेळी स्थानिक गावाकऱ्यांनी वेळेच मदत करून आग विझवली त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे गावाकर्यांना कडून कळले असता . या घटनेस दोन दिवस उलटूनही शासकीय कर्मचारी किंवा प्रतिनिधी ची कुठलीच मदत न मिळाल्याने नडगे कुटुंब अडचणीत होते. ही माहिती भाजपा चे जिल्हा आदिवासी आघाडीचे अध्यक्ष श्री.मिलिंद झोले यांना कळताच घटनास्तळी जाऊन मदतीचा हात देत.धान्य, व कपडे यांचे किट देऊन मदत केली व सदरील घटने बाबद प्रशासना कडून पंचनामा करून आर्थिक मदत मिळून देण्याचे आश्वासन दिले. ऐन पावसाळ्यात साठून ठेवलेले तीन महिन्याचे राशन पाणी कपडे जळाल्याने संकटात असलेल्या नडगे परिवारास मदत दिल्याने ग्रामस्थानी मिलिंद झोले व सहकारी टीम चे आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते भाऊ पवार, ईश्वर गांगुर्डे, . संजय सरक्ते, योगेश घुलूम, रवींद्र गरले, नरेश झोले, धीरज काळे हे उपस्तित होते