फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, डॉ बाबासाहेब जयंती उत्सव कमेटी ,माता रमाई महिला मंडळ आगाशिवनगर यांच्या वतीने आषाढ पौर्णिमा दिवशी रविवार दि २१ रोजी १० वा तथागत भगवान गौतम बुध्द प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मुर्ति प्रतिष्ठापना आझाद कॉलनी पाणीपुरठा आॕफीस शेजारी आगाशिवनगर बुध्द विहार येथे सकाळी १० वाजता भव्य मुर्तिची मिरवनुक भन्ते विमलरत्न महास्थविर मुंबई यांच्या हस्ते बुध्दविहार मध्ये मुर्ति प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्यावेळी मान्यवर मुर्ति दाते मधुकर जगधनी ( आण्णा ) ,विकास भंडारे फौजी ,दिपक एटांबे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आयु व्ही आर थोरवडे माजी अध्यक्ष संघटक भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हा ,आयु समाजरत्न राहुल रोकडे अध्यक्ष तारळे विभाग बौध्द विकास सेवा संस्था छत्रपती संभाजी महाराज समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार विजेते व संस्कार सचिव भारतीय बौध्द महासभा पाटण तालुका.
आयु बि जे माने तालुका अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा ,कराड तालुका आर बी पाटणकर सचिव संस्कार विभाग कराड ,विजय भंडारे बौध्दाचार्य .किशोर धरपडे ,
सुनिल माने ,राजेंद्र सावंत आदि मान्यवर उपस्थीत राहणार आसुन कार्यक्रमला कराड तालुक्यातुन परिसरातुन बहुसंखेने उपस्थीत रहावे असे फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, डॉ आंबेडकर जयंती उत्सव कमेटी, माता रमाई महिला मंडळ, आगाशिवनगर यांनी विनंती केली आहे