मोखाडा : सौरभ कामडी
पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल जव्हार तालुक्यातील आदिवासी भागात सर्वात पहिला येणारा सण हा कोवळी भाजीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात ,नवीन पाण्याची नवीन मोड आणि पावसाळ्याची सुरुवात याचा आनंद व्यक्त करण्यासाठी शेतकरी आपल्या पिकांची पेरणी पूर्ण झाल्यावर व पाऊस पडल्यानंतर जंगलात सर्वात पहिली राणभाजी उगवते ती भाजी जंगलात जावून घेवून येतात. व गावातील गावदेवता,निसर्ग देवता यांना गावातील पुजारी शेंदूर लावतात व देवाला विनवती करून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो.
हा सण केलेंडरप्रमाणे एखाद्या विशिष्ट तिथीलाच येतो असे नाही .तर पाऊस पडल्यानंतर कवळी भाजी रानात उगवली का हे पाहून गावातील ज्येष्ठ नागरिक एकत्र येवून एक वार निश्चित करतात .जंगलातील भाजी ही दिवसा जावून घरी आणल्यानंतर गावाच्या गावदेवीजवळ थोडीशी भाजी ठेवून नंतर संध्याकाळी प्रत्येक घरोघरी शिजवली जाते त्यांनतर कुलदौवतासाठी निवद ( नैवद्य )ठेवून नंतर घरातील लेकी बाळीसह सगळेजण जेवायला बसतात.या सणाला नवीन लग्न होवून सासरी गेलेल्या पोरी आवर्जुन माहेरी आणल्या जातात.
कवळी भाजी ही बलवर्धक ,रोगप्रतिकार शक्तीत वाढ करणारी,मेंदू सतेज ठेवणारी व स्रीयांच्या गर्भाशयातील विकार दूर करणारी आहे.असे जुणी जाणती माणसे म्हणातात.या सणाच्या दिवशी आदिवासी पाड्यावर संध्याकाळी माणसे तारपा नाच, कांबड नाच,ढोलनाच पोरं पोरी पुरुष स्रीया अगदी म्हातारी माणसे देखील तालासुरात नाचतात व सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप उत्साह असायचा.