डॉ. श्रीपाल सबनीस,डॉ.प्रदिप आवटे मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी विनोद धुमाळ
अकलूज : मळोली ता.माळशिरस या गावी १९६७-६८ ते १९८८ पर्यंत जीवन शिक्षण मंदिर या प्राथमिक शाळेत शिकविणारया शिक्षिका कौसल्या महादेव रोकडे उर्फ माता यांचे निधन २१ एप्रिल १९९४ ला झाले असले तरी आज त्यांच्या निधनानंतर ३० वर्षांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘ प्रेरणाशक्ती माता कौसल्या महादेव रोकडे स्मृतिगौरव ग्रंथ संपादित केला आहे. आपले गाव ,आपल्या गावचा निसर्ग ,आपल्या गावचे संस्कारशील शिक्षक यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारा हा ग्रंथ एक ऐतिहासिक ग्रंथ स्वरूपाचा ग्रंथ असून या गावातील मातांचे विद्यार्थी,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा च्या भाषामंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे व माता यांची नात सौ.मीनल अमोल उनउने यांनी हा संपादित केला आहे. साहित्यवेल प्रकाशन सातारा या प्रकाशनाने तयार केलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस व राज्यातील एक वरिष्ठ आरोग्य अधिकारी ,कवी व लेखक डॉ.प्रदीप आवटे यांचे हस्ते, अकलूज येथील कांतीलाल सांस्कृतिक भवन ,यशवंतनगर अकलूज येथे शनिवार दिनांक १८ मे २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता होत आहे.
कौसल्या महादेव रोकडे यांनी आपल्या स्वतःची मुले तर उच्चशिक्षित बंनवलीच पण अनेक मुलांना उच्च शिक्षण घेण्यास देखील प्रेरित केले. शैक्षणिक सेवाकाळ पूर्ण व्हायच्या आतच आजाराने २१ एप्रिल १९९४ ला त्यांचे निधन झाले. --आज त्यांना जाऊन ३० वर्षाचा काळ निघून गेला तरीही त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या हृदयात मातांच्या अनेक आठवणी तेवत राहिल्या. नीतीचा दिवा मनात सत्य,अहिंसा ,सचोटीचे संस्कार करत राहिला मातांची आठवण संवेदनशील विद्यार्थ्यांना तीव्रतेने झाल्याने त्यांच्या विद्यार्थ्यांनी मातांच्या कार्याची आठवण रहावी व जीवन शिक्षण मंदिर या शाळेतील शिक्षकांचे योगदान कळावे यासाठी ‘ग्रंथ प्रकाशित करायचे ठरवले..आणि जवळपास दोन वर्षे संपर्क करून मातांचे सहकारी शिक्षक ,विद्यार्थी,कुटुंबीय ,ग्रामस्थ यांचेकडून आठवणी संकलित केल्या.... त्यांच्या या आठवणी म्हणजे हे आधुनिक लीळाचरित्र. भक्तीपेक्षा कृतज्ञता व्यक्त करण्याच्या,प्रेमाने गाव जोडण्याच्या,मनातील सुख दुःखाचे दिवस सांगण्याच्या भावनेने जवळपास १०० पेक्षाही जास्त विद्यार्थी व शिक्षक लेखनात सहभागी झाले आहेत. इतिहास,भूगोल,संस्कृती,निसर्ग, माणूसपण या ग्रंथात व्यक्त झाले आहे.