Type Here to Get Search Results !

पनवेल उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेशा व मनसेचे वाहतूक सेना जिल्हा संघटकांचा ही समावेश


पनवेल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांचा वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे गटात ऍम्ब्युलन्स साहित प्रवेश या प्रवेशा मध्ये मनसेचे वाहतूक सेना जिल्हा संघटकांचा ही समावेश.


उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अवजड वाहतूक सेनेचे अध्यक्ष इंदरजित सिंह बाल आणि पनवेलचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, शिव वाहतूक सेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे  नितीन कसाबे यांनी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.


 यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी यांच्यासह मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक विजय जाधव, युवा समाजसेवक चेतन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 


शैलेश जगनाडे आणि नितीन कसाबे या पदाधिकाऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असताना जनतेला सेवा मिळावी यासाठी एक रुग्णवाहिका घेऊन ती त्यांना पक्षाला द्यायची होती, मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख पनवेलमध्ये दौऱ्यासाठी आले असता या ॲम्बुलन्सचे लोकार्पण करावे एवढी कार्यकर्त्यांची साधी इच्छाही त्यांच्याकडून पूर्ण केली गेली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या या पदाधिकाऱ्यांनी या रुग्णवाहिकेसकट एकनाथ शिंदे यांच्या
शिवसेनेत प्रवेश केल्या असल्याचे बोले जात आहे.


यावेळी या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत स्वागत करून वर्षा निवासस्थानी या रुग्णवाहिकेचे नारळ फोडून लोकार्पण करण्यात आले. तसेच निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या या दोन्ही कार्यकर्त्यांच्या पाठीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुकाची थाप दिली. 
 
या प्रवेशा वेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रा.मनीषा कायंदे, उपनेते विजय नहाटा, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, सुशांत शेलार, उपनेत्या सौ.कला शिंदे, विभागप्रमुख संध्या वढावकर, पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महानगरप्रमुख ऍड.प्रथमेश सोमण, शहरप्रमुख प्रसाद सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad