Type Here to Get Search Results !

मुंबई शहरातील महत्वांच्या स्मारकासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक


मुंबई शहरातील महत्वांच्या स्मारकासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक 


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत मुंबई शहरातील मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली दर्गा, जगन्नाथ शंकरशेठ स्मारक व भागोजी शेठ कीर स्मारकासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत  

यावेळी महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी मुंबई महापालिकेने ६० कोटी रुपयांचा निधी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तर मुंबादेवी मंदिर सौंदर्यीकरणासाठी २२० कोटी, जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी तर भागोजी शेठ कीर स्मारकासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे  

मुंबईतील शहरातील महालक्ष्मी, मुंबादेवी, हाजी अली प्राचीन देवस्थान आहेत, त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देतानाच भाविकांना सुलभ दर्शनासाठी सोयीसुविधा कराव्यात, महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिराचा विकास करताना परिसरातील मंदिरांचे देखील सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत, 

या बैठकीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नाना शंकरशेठ यांच्या कुटुंबातील विलास शंकरशेट, जिमी शंकरशेठ आणि पद्मिनी शेठ आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad