गाव तिथे शाखा घर तेथे शिवसैनिक हा संकल्प महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आ. एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब व रोजगार हमी व फलोत्पादन तसेच खार जमीन विकासमंत्री आ. भरत शेठ गोगावले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
तसेच शिवसेना उपनेते मा.आमदार शहाजी बापु पाटील साहेब सोलापूर जिल्हा निरीक्षक आ .मा.आमदार संजय कदम साहेब माढा लोकसभा संपर्क प्रमुख व डबल महाराष्ट्र केसरी आ.चंद्रहारदादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकासाची वारी, शिवसेना आपल्या दारी हे अभियान राबवणार आणि मंत्री महोदयांकडे आढावे देऊन, गाव, शहर, वाड्या, वस्त्याना भेटी देऊन शिवसेनेच्या शाखा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात उभा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
11 मे 2026 रोजी सकाळी 9:00 वाजता शिवनेरी बंगला महाड येथे शिवसेनेची बैठक पार पडली
मंत्री भरत शेठ गोगावले यांचे मार्गदर्शन सर्व शिवसेना पदाधिकारी यांना लाभले. आदरणीय भरत शेठ गोगावले साहेबांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.
भिमराव भुसनर पाटील यांचे चिरंजीव पैलवान अजय व सुजय यांनी कुस्ती स्पर्धेत व मैदान गाजवून अनेक कुस्त्यात ट्राॅफी सह गदा मिळवल्याने व शिवसेनेचे नाव उंचवल्याने वैभवशाली सन्मान करून मंत्री गोगावले साहेब यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या,
यावेळी उपस्थित शिवसेना ओबिसी आघाडी चे प्रदेश अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील तसेच भारतीय दलित महासंघाचे प्रदेश अध्यक्ष व मा.सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे माळशिरस तालुका प्रमुख व खंडकरी शेतकरी सेनेचे नेते शासकीय समिती सदस्य तानाजी भोसले ,भोळे पाटील पैलवान सादिक पठाण विद्यार्थी शिवसेनेचे शिवदत्त भोळे पाटील माळशिरस तालुका ओबिसी प्रमुख शहाजी काळे विक्रम काशीद शुभम राऊत अमीर भैय्या शेख उपस्थित होते.
