Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन ‘पीएम-सुरज’ पोर्टलचे लोकार्पण सोहळा


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन ‘पीएम-सुरज’ पोर्टलचे लोकार्पण सोहळा

भारत देशातील वंचित व मागासवर्गातील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘पीएम-सुरज’ पोर्टलचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओनलाइन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले आहे,  


मुंबई येथे या सोहळ्या दरम्यान वंचित व मागास घटकांचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होणार नाही, त्यामुळे देशातील वंचित आणि मागास घटकांच्या विकासावर केंद्र सरकार भर देत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.


 सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे आयोजित या लोकार्पण सोहळ्या वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नरेश साहेबराव अवचर या उद्योजकाशी संवाद साधला, नरेश हे कृषीतील निरूपयोगी पाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत काम करत आहेत, त्यांनी ‘असिम’ म्हणजेच डॉ. आंबेडकर सोशल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अर्थसहाय्य मिळून हा उद्योग सुरू केल्याचे सांगितले, त्यांच्या या उद्योगाने प्रभावित झाल्या असल्याचे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, कृषी विभागा सोबतच पर्यावरणासाठीही चांगले काम करत असल्याबद्दल नरेश यांचे कौतुक केले.  


पंतप्रधान नमस्ते योजनेंतर्गत सफाई कामगारांना पीएम-सूरज पोर्टल लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पीपीई-किटचे वाटप करण्यात आले, सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित या कार्यक्रमास 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे तर दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विरेंद्र सिंह यांच्यासह विविध राज्यातील लाभार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad