Type Here to Get Search Results !

आपल्या भागातील निवडणुका कुठल्या टप्प्यामध्ये होणार पहा ?

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठल्या टप्प्यामध्ये होणार ?👇◾


◾पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾दुसरा टप्पा 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी

◾तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले

◾चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

आचारसंहिता लागू झाल्यावर 'या' कामांवर बंदी, नियम डावलल्यास शिक्षा काय?

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासूनच आदर्श आचारसंहिता लागू होते आणि निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहते. विशेष म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यावर अनेक उपक्रमांवर आणि कामांवर बंदी घातली जाते. तसेच, आचारसंहिता भंग केल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागते. 

🚫 आचारसंहिता काळात 'या' कामांवर बंदी...
आचारसंहिता काळात सरकार धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही.
कोणत्याही योजनेचे उद्घाटन किंवा अंमलबजावणी आचारसंहिता काळात करता येणार नाही.
सरकारी कर्मचाऱ्यांची बदली व पदोन्नतीचे आदेश देखील आचारसंहिता काळात काढता येत नाही.
निवडणुकीच्या प्रचारात सरकारी वाहन, कर्मचारी यांचा वापर करण्यास आचारसंहिता काळात मनाई असते.
आचारसंहिता काळात धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करता येत नाही.
निवडणुकीच्या प्रचार करतांना सभा, रॅलीसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते.
आचारसंहिता काळात परवानगीशिवाय घर, दुकान, जमीन किंवा आवारात बॅनर व पोस्टर्स लावता येणार नाहीत

🙅🏻‍♂️ प्रचारात मुलांचा वापर करण्यास मनाई...
5 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे. ज्यात म्हटले आहे की, "राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी प्रचारादरम्यान मुलांना आपल्या मांडीवर घेऊ नये, त्यांना वाहनांमध्ये बसवू नये किंवा रॅलीत सहभागी करून घेऊ नयेत. निवडणूक आयोगाने मुलांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोस्टर्स आणि पॅम्प्लेट वाटप करण्यास, घोषणाबाजी करण्याचे कामे देऊ नयेत असेही सांगितले आहे.

🪧 राजकीय पक्षाचे होर्डिंग काढावे लागतील....
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच राज्यात आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे राजकीय पक्षाकडून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग तात्काळ काढून घ्यावे लागते. आचारसंहिता जाहीर झाल्यावर प्रशासनाची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला होर्डिंग लावता येत नाही. अन्यथा आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होतो.

❌ रात्री 10 नंतर सभा घेण्यास मनाई...
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, “सकाळी 6.00 च्या आधी आणि रात्री 10.00 नंतर सार्वजनिक सभा घेता येणार नाहीत. याव्यतिरिक्त, मतदान बंद होण्यासाठी निश्चित केलेल्या 48 तासांच्या कालावधीत उमेदवार सार्वजनिक सभा आणि मिरवणुका घेऊ शकत नाहीत.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies