Type Here to Get Search Results !

माढ्यात भाजपच्या घटक पक्षांची नाराजी मित्रपक्ष निंबाळकर यांच्या विरोधात


माढ्यात भाजपच्या घटक पक्षांची नाराजी मित्रपक्ष निंबाळकर यांच्या विरोधात

भारतीय जनता पक्षाने माढयाची उमेदवारी रणजीतसिंह निंबाळकर यांना जाहीर केल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक तालुक्यात बैठका घेण्यास सुरुवात केली. मात्र सदर बैठकीला भाजपचे घटक पक्ष यांना बोलावले नाही त्यांना विश्वासात घेतले नाही त्यामुळे याचा फटका रणजीत निंबाळकर यांना बसण्याची जोरदार शक्यता आहे रयत क्रांती संघटना बच्चू कडू यांचा प्रहार संघटना यांना कुठेही भारतीय जनता पक्षाने सन्मानाने बोलावले नाही त्यामुळे घटक पक्ष नाराज आहेत नुकतेच माढा येते संजय शिंदे यांच्या फार्म हाऊस वरती रणजीत निंबाळकर यांच्या प्रचाराची बैठक संपन्न झाली या बैठकीला कोणालाही निमंत्रण दिले गेले नाही त्यामुळे आगामी काळात मित्रपक्ष माढ्यात भाजप विरोधात तीव्र संताप व्यक्त करतील यात काही शंका नाही भारतीय जनता पक्षाने आम्हाला विश्वासात घेतले नाही त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये रणजीत सिंह निंबाळकर यांच्या विरोधात भूमिका घेणार असे रोखठोक मत मत रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांनी सांगितले

रणजीत निंबाळकर हे सोलापूर जिल्ह्यातील नसून सुद्धा मागच्यावेळी त्यांना खासदारकीला निवडून दिले भरघोस मताने त्यांच्या पदरात मताचे दान टाकले परंतु खासदार झाल्यानंतर त्यांनी मोजकेच पुढारी हाताशी धरले त्यामुळे सामान्य माणूस आज संतप्त झालेला आहे जो तो निंबाळकर विरोधात प्रतिक्रिया देत आहे याचा भारतीय जनता पक्षाने विचार करावा घटक पक्ष म्हणजे भाजपचे गुलाम नाहीत पाहिजे तेव्हा तुमच्या घरची धुणीभांडी करतील भाजपच्या नेत्यांनी वेशांतर करून गाववाड्यात यावे आणि सामान्य माणस काय बोलतात रणजीत निंबाळकर यांच्या विषयी किती त्यांच्या मनामध्ये राग आहे हे त्यांना कळेल जरी निंबाळकर यांना उमेदवारी दिली असली तरी सोलापूर जिल्ह्यातील माढा करमाळा माळशिरस सांगोला येथील जनता ही निंबाळकरांना अजिबात मतदान करणार नाही असे रोखठोक राहुल बिडवे यांनी सांगितले

माढा लोकसभेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर कोणत्याही बैठकीत आम्हाला बोलवले नाही बहुतेक भाजपच्या गर्विष्ठ नेत्यांना आमची गरज वाटत नसेल परंतु आमच उपद्रवमुल्य काय आहे हे निबांळरांना पराभूत करुणच दाखवून देऊ
राहुल बिडवे 
राज्य प्रवक्ते रयत क्रांती संघटना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies