आंबेगाव तालुका / सोमवार दि 4/3/2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्द, येथे कवयित्री शांता शेळके सभागृह इमारतीचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्या हस्ते या वास्तूचे उदघाटन झाले असून सहकारमंत्री मा. दिलीपराव वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सभागृहचे बांधकाम झाले आहे. या उदघाटण प्रसंगी शिवसेना उपनेते व शिरूर लोकसभा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे ही उपस्तित होते , सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात केलेल्या विकासकामांची प्रशंसा करत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदर शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पुढील विकासकामांना पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. या शुभप्रसंगी आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक देवेंद्रशेठ शहा, माजी आमदार पोपटराव गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक वृंद , विद्यार्थी , ग्रामपंचायत अवसरी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
अवसरी