Type Here to Get Search Results !

मंचर उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्तितीत भव्य शेतकरी मेळावा


मंचर येथे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्तितीत भव्य शेतकरी मेळावा .

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव-शिरूर यांच्यावतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 



यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील यांच्या शुभहस्ते तालुक्यातील 408 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. 



याप्रसंगी उपस्थित शेतकरी बंधू-भगिनींना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री व आंबेगाव तालुका मतदार संघाचे विद्यमान आमदर दिलीप वळसे पाटील यांनी मार्गदर्शन केले 



तसेच यावेळी तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. याप्रसंगी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने काम करत राहू आणि आंबेगाव तालुक्याच्या विकासाला अधिक गतिमान करू असा विश्वास महाराष्ट्र राज्या चे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले



या शेतकरी मेळाव्यास जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार विलास लांडे, दुधसंघाचे अध्यक्ष भगवानराव पासलकर, तालुक्यातील विविध पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रतिनिधी :- आकाश भालेराव 
मंचर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad