घोडेगाव परिसरामधील विविध भूमिपूजन आणी उदघाटणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न
आंबेगाव तालुका / सोमवार दि 4/3/2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आंबेगाव तालुक्या मधील विविध भूमिपूजन आणी उदघाटणे संपन्न झाले.
त्या वेळेस शिवसेनेचे उप नेते व शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे ही उपस्तित होते , घोडेगाव या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जंगी असे स्वागत केले.
या वेळी घोडेगाव येथी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी निवास स्थान इमारत उदघाटन समारंभ तसेच घोडेगाव ग्रामीण रुग्णालय इमारत अधिकारी व कर्मचारी निवास्थान इमारत भूमिपूजन समारंभ घोडेगाव बस्थानक इमारत भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडले.
या उदघाटन समारंभा साठी पोलीस प्रशासन , सार्वजनिक बांधकाम विभाग , घोडेगाव ग्रामपंचायत व काळेवाडी दरेकरवाडी ग्रामपंचायत , घोडेगाव येथी मुस्लिम बांधव व विविध संघटनांकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सत्कार करण्यात आला या वेळी मोठ्या संख्येने नागरिक व पदाधिकारी उवस्तीत होते
प्रतिनिधी - आकाश भालेराव
घोडेगाव