Type Here to Get Search Results !

मंचर येथील नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उदघाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न



मंचर येथील नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उदघाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न


आंबेगाव तालुका / सोमवार दि 4/3/2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते


आज आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उदघाटन उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते या इमारतीचे उदघाटन करण्यात आले त्या वेळेस शिवसेना उप नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील उपस्तित होते, संबंधित वास्तू उभारण्याचे काम सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे,


 उन्हातान्हात आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस दलाकरिता सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. 


या प्रसंगी,विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण पंकज देशमुख, माजी आमदार पोपटराव गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, कार्यकारी अभियंता रावबहादूर पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यमपल्ले, तहसीलदार संजय नागटिळक, गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक कैलास पाटील, तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक दत्तात्रय जाधव , मंचर शहरतील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रतिनिधी - आकाश भालेराव
मंचर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad